EPF Passbook Download | EPF Passbook डाउनलोड करता येत नाही? तर, जाणून घ्या सोपी पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPF Passbook Download | तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच Provident Fund हे उपयोगी पडते. PF खात्यामध्ये जमा केलेले पैसे तुमचे भविष्य सुरक्षित (EPF Passbook Download) करण्याचे काम करत असते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनामध्ये (EPFO) तुमचे खाते असल्यास तुमच्या PF खात्यात आतापर्यंत किती पैसे जमा झाले आहेत?, यासारख्या काही गोष्टींची काळजी घेणेही आवश्यक आहे. त्याचबरोबर या खात्यावर व्याजदर किती आहे?, हेही बघणे महत्वाचे आहे.

 

दरम्यान, तुम्हाला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी EPF पासबुकबाबत आवश्यक माहिती अथवा तुम्हाला पासबुक डाउनलोड (EPF Passbook Download) करता येत नसेल तर त्याविषयी माहिती जाणून घेणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर इंटरनेटवरून ईपीएफ पासबुक डाउनलोड करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. ईपीएफ पासबुक डाउनलोड करण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

तर, पासबुक डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login.jsp ला भेट द्यावी लागणार आहे. यानंतर मेंबर आयडीचा पर्याय निवडून तुम्ही तुमचे EPF पासबुक सहज पाहू शकणार आहे.

 

कसे कराल डाउनलोड पासबुक?

– सर्वप्रथम तुम्हाला EPFO च्या अधिकृत वेबसाइट https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ ला भेट द्यावी लागेल.

– त्यानंतर तुम्हाला UAN च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

– तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला तुमचे आवश्यक डिटेल्स टाकावे लागतील.

– ही प्रक्रिया केल्यानंतर Get Authorization Pin या पर्यायावर क्लिक करा.

– स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्ही टाकलेल्या तपशीलांची पडताळणी करावी लागेल.

– यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल. बॉक्समध्ये ओटीपी टाकल्यानंतर, तुम्हाला Validate OTP and activate हा पर्याय निवडावा लागेल.

– तुमचा UAN सक्रिय झाल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर पासवर्डसह SMS येईल.

– हा पासवर्ड वापरून तुम्ही तुमच्या खात्यात लॉग इन करू शकता.

– UAN सक्रिय झाल्यानंतर सुमारे 6 तासांनंतर तुम्ही तुमचे EPF स्टेटमेंट पाहू शकणार आहे.

 

Web Title :- EPF Passbook Download | follow these steps to download epf passbook read details see steps

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा