Nawab Malik | नवाब मलिकांचा खळबळजनक दावा; म्हणाले – ‘तो’ सल्ला मीच शरद पवारांना दिला होता’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Nawab Malik | पुणे (Pune) येथे महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) कार्यकर्त्यांतर्फे राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी मलिकांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला. ‘एनसीबी झाली, आता ईडीची बारी’, असं म्हणत मलिकांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना इशारा दिला. तसेच, ‘ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना नोटीस पाठवल्यानंतर ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याची घोषणा करण्याचा सल्ला मीच पवार यांना दिला असल्याचा दावा मलिकांनी केला. या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

 

नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले, ‘शरद पवार यांना ईडीनं नोटीस पाठवल्यानंतर काय करायचं यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं बैठक घेतली होती. या बैठकीत काही जणांनी वकिलांचा सल्ला घेण्याची सूचना केली. मात्र, तेव्हा ही कायदेशीर लढाई नसून राजकीय लढाई असल्याचं निदर्शनास आणून दिलं. नंतर पवार यांना ईडीच्या कार्यालयात जाण्याची घोषणा करण्यास सांगितलं. त्यावर पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात या निर्णयाची घोषणा केली होती.

 

पुढे मलिक म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीच्या आधी ईडीकडून (ED) शरद पवार यांना समन्स बजावण्यात आले होते. शरद पवारांनी त्यावेळी ईडीच्या कार्यालयात जावं, ही भूमिका त्यावेळी सर्वप्रथम मी पक्ष बैठकीत मांडली होती. पवारांनी ती उचलून धरताच पुढे काय झालं हे आपल्या सर्वांना माहितच आहे. ईडीच्या कारवाईविरोधात कायदेशीर मार्गाने नाहीतर राजकीय मार्गानेच प्रत्युत्तर द्यावं लागेल, असं मी त्यावेळीच शरद पवारांना सांगितलं होतं.

‘देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा भंडाफोड करण्यासाठी हायड्रोजन बॉम्ब मी अजून फोडलेला नाही.
तो योग्यवेळी नक्कीच फोडेन. माझ्याकडेही भाजपवाल्यांच्या अशा सीडी आहेत की ज्या लावल्या तर यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही,
दरम्यान, इतके दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) भाजपचं ओझं खांद्यावर वाहत होते.
बहुतेक त्यांना ऑपरेशन करुन घ्यावे लागले.
बरं झालं त्यांनी वेळीच हे भाजपचं ओझं खांद्यावरुन उतरवलं.
देश पातळीवर शरद पवार काँग्रेसला सोबत घेऊनच भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधतील,
तर, मी भाजपची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही, असंही मलिक म्हणाले.

 

Web Title :- Nawab Malik | i had given that advice to the ed office sharad pawar nawab malik said in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | TC चा काळा कोट अन्….. रेल्वेत नोकरी लावण्याचं आमिष, दोघी अटकेत

IND Vs NZ | टेस्ट सिरीजमध्ये तब्बल 133 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती; ‘या’ अनोख्या रेकॉर्डशी केली बरोबरी

Vijay Wadettiwar | ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नव्याने निर्बंध?, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांचे मोठे वक्तव्य