खुशखबर ! दिवाळीपुर्वीच 6 कोटी खातेदारांच्या खात्यात जमा होणार ‘EPFO’ चं ‘गिफ्ट’, असा चेक करा तुमचा ‘बॅलन्स’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह संघटना आपल्या 6 कोटीपेक्षा जास्त खातेदारांना दिवाळीचे गिफ्ट देणार आहे. EPFO आपल्या सर्व सब्सक्राइबर्सला आर्थिक वर्ष 2018-19 साठी एम्प्लॉई प्रॉव्हिडंड फंडवर 8.65 टक्के दराने व्याज देणार आहे. हे व्याज 6 कोटी खातेदाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. जर तुम्ही तुमच्या खात्यातील पैसे चेक करु इच्छितात तर तुम्हाला मिस कॉल सर्व्हिसचा वापर करावा लागेल, तसेच तुम्ही ऑनलाइन किंवा एसएमएसच्या माध्यमातून देखील पीएफ बॅलेंस चेक करु शकतात.

54,000 कोटी रुपये खातेदारांच्या खात्यात जमा केले जातील –
आतापर्यंत EPFO 2017-18 साठी मंजूर व्याजदर 8.55 टक्क्यांच्या हिशोबाने EPF काढण्यासाठीच्या दाव्याचा पाठपुरावा करत आहे. श्रम मंत्रालयाने 2018 – 19 साली EPF वर 8.65 टक्के व्याजदराने अधिसूचित केले आहे. हे 2017 – 18 च्या तुलनेत 0.10 टक्के अधिक आहे. यानंतर 6 कोटी खातेदारांच्या खात्यात 2018-19 साठी 8.65 टक्के व्याज दराच्या हिशोबाने 54,000 कोटी रुपये जमा करण्यात येतील.

असे चेक करा तुमचे EPFO पासबुक –

1. अ‍ॅपच्या माध्यमातून करा बॅलेंस चेक –
तुमच्या पीएफ बॅलेंसची माहिती तुम्हाला ईपीएफओच्या अॅपवरुन मिळेल. यासाठी सर्वात आधी तुम्हाला मेंबरवर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर यूएएन नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला लगेचच खात्याची माहिती मिळेल.

2. मोबाइल नंबरवरुन मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या बॅलेंस –
यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन 011-22901406 यावर मिस कॉल द्यावा लागेल. यानंतर मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील बॅलेंस जाणून घेता येईल.

– मिस्ड कॉल नंतर तुम्हाला लगेचच एक मेसेज मिळेल.
– हा मेसेज AM-EPFOHO कडून पाठवण्यात येईल.
– EPFO कडून हा मेसेज पाठवण्यात येतो.
– या मेसेजमधून तुम्हाला सर्व माहिती मिळेल.

EPF बॅलेंस आणि पासबुक ऑनलाइन –
– EPFO ने आपल्या अधिकृत वेबासाइटवर ईपीएफ बॅलेंस तपासण्याची सुविधा दिली आहे. ई-पासबुक संबंधित लिंक तुम्हाला वेबसाइटमध्ये मिळेल.
– यानंतर व्यक्तीला आपला यूएएन नंबर आणि त्याचा पासवर्ड टाकावा लागेल.
– वेबसाइटवर यूएएन नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला व्हयू पासबूक बटनावर क्लिक करावे लागेल आणि तुम्हाला तुमच्या खात्यातील बॅलेंसची माहिती मिळेल.

Visit : Policenama.com