EPFO ची मोठी घोषणा ! आता नोकरी बदल्यानंतर PF अकाऊंट ट्रान्सफर करण्याची गरज नाही, मध्यवर्ती सिस्टम येणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO | कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (EPFO) सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची (Central Board of Trustees) आज बैठक झाली. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. प्रोव्हीडंट फंड (PF) अकाऊंटच्या केंद्रीकृत प्रणालीला (सेंट्रलाइज सिस्टम) (Centralized system) मंजुरी दिली जाईल असं या बैठकीत ठरवण्यात आले आहे. म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्यानं नोकरी बदलली की त्याला पीएफ खातं ट्रान्सफर (PF account transfer) करण्याचा व्याप आता करावा लागणार नाही. कारण हे काम आता आपोआप होणार आहे.
आता कागदी घोडे नाचवण्याची गरज नाही
सेंट्रलाइज सिस्टमच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचं जुनं पीएफ खातं नव्या खात्यात आपोआप विलीनीकृत (Automatically merged) होणार आहे. सध्या कोणत्याही कर्मचाऱ्याने एखादी कंपनी सोडली किंवा एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत नोकरी (Job) स्वीकारली तर त्याचं नव्या कंपनीकडून नवीन पीएफ खातं उघडलं जातं किंवा आधीच्या खात्यातील रक्कम खातेधारकाला ट्रान्सफर करावी लागते. आतापर्यंत PF Account ट्रान्सफर करण्याचं काम खातेधारकालाला स्वत:ला करावं लागत होतं. यासाठी जुन्या कंपनीशी निगडीत काही कागदपत्रांची पुर्तता करणं व इतर काही औपचारिकता पार पाडावी लगते. आता कर्मचाऱ्यांना कागदी घोडे नाचवावे लागणार नाहीत.
–
काय होणार बदल?
सेंट्रलाइज सिस्टममुळे वेगवेगळी पीएफ खाती मर्ज होऊन एकच खातं तयार होईल.
यापूर्वी खात्याचे विलीनीकरण करण्यासाठी खातेधारकाला स्वत: कष्ट घ्यावे लागत होते.
मात्र आता संबंधीत कर्मचाऱ्याचे खाते आपोआप विलीनीकृत होणार आहे.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव (Union Minister Bhupendra Yadav) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ईपीएफओच्या (EPFO) 229 व्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत अजूनही वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा सुरु आहे.
यामध्ये व्याज वाढविण्यापासून पेन्शनधारकांची कमीत कमी पेन्शन एक हजारावरुन 3 हजार रुपये केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ट्रेड युनियननं (Trade union) श्रम मंत्रालय आणि EPFO कडे पेनशनची रक्कम सहा हजार करण्याची मागणी केली आहे.
Web Title :- EPFO | epfo board trustees meeting no pf account transfer after quit job centralized system will merge marathi news policenama
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 45 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी