जनतेचे PF चे पैसे शेयर बाजारात लावणार EPFO, केवळ मंजुरीची आहे प्रतीक्षा

नवी दिल्ली : EPFO | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) एक्सचेंज-ट्रेडेड फंड Exchange-Traded Fund (ईटीएफ – ETF) मधील आपली सर्व रिडेम्प्शन आवक शेयर बाजारात (Stock Market) पुन्हा गुंतवण्याची तयारी केली आहे. यासाठी अर्थ मंत्रालयासोबत (Ministry of Finance) सुद्धा चर्चा सुरू झाली आहे.

EPFO ची प्रमुख निर्णय घेणारी संस्था, केंद्रीय विश्वस्त मंडळाने मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आपल्या बैठकीत यासाठी संमती दिली होती.

इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, EPFO ने असे उपाय सूचवले आहे जे बाजारात अस्थिरता असूनही इक्विटी रिटर्न वाढवू शकतील. अधिकारी म्हणाले, प्रस्तावात ईटीएफ रिटर्न आता ४ वर्षाच्या तुलनेत सेन्सेक्सच्या सरासरी ५ वर्षाच्या रिटर्नवर गणना करणे, याचा देखील समावेश आहे. यावर अर्थ आणि कामगार मंत्रालयाच्या मंजुरीनंतर ईपीएफओ पुढील प्रक्रिया सुरू करेल.

पीएफ खातेधारकांच्या खात्यात जमा रक्कम EPFO वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवते. या गुंतवणुकीद्वारे होणाऱ्या कमाईचा एक हिस्सा व्याज म्हणून पीएफ खातेधारकांना दिला जातो. ईपीएफओकडून सब्सक्रायबर्सला आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी पीएफ अकाउंटमध्ये जमा रक्कमेवर ८.१५% व्याज दिले जात आहे.

१५% पर्यंत गुंतवणुकीला परवानगी :
अर्थ मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, ईपीएफओ आपल्या उत्पन्नातील ५% ते १५% दरम्यान इक्विटी आणि संबंधित फंड्स इत्यादीमध्ये गुंतवणूक करू शकते. मात्र, ईपीएफओ ईटीएफ गुंतवणूक मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल करण्याची सुद्धा मागणी करत आहे.

ईटीएफमध्ये किती गुंतवणूक :
अलीकडेच सरकारने सभागृहाला सांगितले की, ईपीएफओने चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जुलै कालावधीत
एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) मध्ये १३,०१७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

EPFO ने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या दरम्यान ईटीएफमध्ये ५३०८१ कोटी रुपये, आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ४३,५६८
कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ३२,०७१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

EPFO ने आर्थिक वर्ष २०१९-२० च्या दरम्यान ईटीएफमध्ये ३१,५०१ कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये
२७,९७४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Loan Processing Fees | ‘या’ बॅंकेने केली लोन प्रोसेसिंग फी माफ; कर्जदारांना होणार फायदा

Atal Pension Yojana | अटल पेंशन सरकारी योजना रिटायरमेंटनंतर देऊ शकते दरमहा हजारो रुपये