नोकरदारांसाठी मोठी बातमी ! बदलू शकतो PF सोबत ‘कपात’ होणाऱ्या ‘पेन्शन’ काढण्याचा नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी त्याचा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPFO फार महत्वाचा असतो. संपूर्ण आयुष्याची बचत यामध्ये सामावलेली असते. त्याचबरोबर सरकार यावर आयकरामध्ये देखील सूट देत असल्याने खूप फायदेशीर आहे. मात्र यासंदर्भात मोठी माहिती पुढे येत असून यामधील व्यक्तींना पेन्शन मिळण्यासाठी व्यक्तीचे वय हे 58 वर्ष वरून 60 वर्ष करण्याचा विचार केला जात आहे. त्यामुळे आता तुमच्या नोकरीला 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पेन्शनचा फायदा मिळू शकणार आहे. सध्या तुम्हाला 58 वर्ष वय झाल्यानंतर मासिक पेन्शन मिळण्यास सुरुवात होते.

EPFO members may get option to draw pension after 60 years know about Employees Pension Scheme

का होत आहेत या नियमांमध्ये बदल –

मिळालेल्या माहितीनुसार, सरकार EPF अॅक्ट 1952 मध्ये बदल करण्याचा विचार करत असून जगभरात ठरवण्यात आलेल्या वयाच्या नियमांचे कारण यामागे सांगितले जात आहे. जगभरात अनेक ठिकाणी पेन्शन मिळण्याचे वय हे 65 वर्ष आहे. त्यामुळे यामध्ये बदल करण्याची योजना सुरु आहे. पुढील महिन्यात यासाठी बैठक होत असून यामध्ये यावर विचार केला जाऊ शकतो. यामुळे जवळपास 30 हजार कोटी रुपये पेन्शन फंड सरकारला वापरण्यास मिळणार असून निवृत्तीचे वय देखील 60 वर्ष करण्यात येणार आहे.

EPFO members may get option to draw pension after 60 years know about Employees Pension Scheme

जाणून घ्या पेन्शन विषयी –

नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या वेतनातील काही भाग हा पीएफ म्हणून कपात करण्यात येतो. यासाठी कर्मचाऱ्याच्या वेतनातून 12 टक्के रक्कम हि यासाठी कपात केली जाते. यामधून 3.67 टक्के रक्कम हि पीएफमध्ये तर 8.33 टक्के रक्कम हि कर्मचारी पेंशन योजनेमध्ये जमा होते. सध्या यासाठी वेतनाची मर्यादा हि 15,000 असून यामध्ये महिन्याला 1250 रुपये कपात होतात.

अशा प्रकारे काढू शकता पेन्शनचे पैसे –

एका विशिष्ट कालावधीनंतर तुम्ही तुमची पेन्शनची रक्कम काढू शकता. मात्र यासाठी अतिशय कडक नियम असून विविध कालावधीसाठी हे नियम वेगवेगळे आहेत. तुमच्या नोकरीला 6 महिन्यांपेक्षा जास्त आणि 9 वर्ष 6 महिन्यांपेक्षा कमी वेळ झाला असेल तर तुम्ही फॉर्म 19 आणि 10c भरून पीएफ बरोबरच पेन्शनची रक्कम देखील काढू शकता. मात्र यासाठी तुम्हाला पीएफ कार्यालयात अर्ज सादर करावा लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीने पेन्शन काढण्याची प्रक्रिया अजून सुरु झाली नसून लवकरच ती देखील सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे.

visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like