EPFO-PPO | ‘हा’ नंबर पेन्शनर्ससाठी अतिशय महत्वाचा, अन्यथा अडकू शकतात तुमचे सर्व पैसे; जाणून घ्या

नवी दिल्ली : EPFO-PPO | एम्प्लॉई पेन्शन स्कीम अंतर्गत येणार्‍या पेन्शनधारकांना (Pensioners) एक युनिक नंबर जारी केला जातो, ज्याच्या मदतीने ते निवृत्तीनंतर पेन्शन प्राप्त करू शकतात. या नंबरला पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) म्हटले जाते. कोणत्याही कंपनीतून निवृत्त होणार्‍या व्यक्तीला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) हा नंबर जारी केला जातो. (EPFO-PPO)

निवृत्तीनंतर ईपीएफओ (EPFO) कर्मचार्‍याला एक लेटर जारी करते, ज्यामध्ये पीपीओच्या (PPO) डिटेल्स असतात. जर एखाद्या व्यक्तीने आपला पीपीओ नंबर हरवला तर तो आपल्या बँक खात्याच्या मदतीने सहज प्राप्त करू शकतो. यासाठी कोणती प्रक्रिया आहे जाणून घेवूयात. (EPFO-PPO)

Michael Vaughan | भारताला नावं ठेवणाऱ्या क्रिकेटरला ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूने झापले

– सर्वप्रथम कर्मचारी भविष्य निधी संघटनेची वेबसाइट https://www.epfindia.gov.in/site_en/index.php वर जा.

– आता लेफ्ट साईडमध्ये दिलेल्या ऑनलाइन सर्व्हिसेस सेक्शनमध्ये Pensioners Portal च्या पर्यायावर क्लिक करा.

– क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडेल. या पेजवर लेफ्ट साईडला असलेल्या Know Your PPO No. पर्यायावर क्लिक करा.

– येथे तो बँक अकाऊंट नंबर टाका, जो तुमच्या पेन्शन फंडशी लिंक्ड आहे. किंवा PF नंबर ज्यास मेंबर आयडी सुद्धा म्हणतात, तो टाकून सर्च करा.

– डिटेल्स यशस्वीपणे सबमिशननंतर PPO नंबर स्क्रीनवर दिसू लागेल.

असाही मिळवू शकता पीपीओ नंबर

याशिवाय https://mis.epfindia.gov.in/PensionPaymentEnquiry/ ला नवीन टॅबमध्ये उघडून सुद्धा पीपीओ नंबर प्राप्त करू शकता. पीपीओ नंबर संबधित माहिती प्राप्त करण्यासाठी ईपीएफओची वेगळी वेबसाइट आहे. येथे जीवन प्रमाणपत्र, पीपीओ नंबर, पेमेंटसंबंधी माहिती आणि पेन्शन स्टेटसबाबत माहिती प्राप्त करू शकता.

का आवश्यक आहे PPO नंबर

नेहमी पासबुकवर पेन्शन ऑर्डर नंबर नोंदवून ठेवा.
एका शाखेतून दुसर्‍या शाखेत पेंशन अकाऊंट ट्रान्सफर केल्यानंतर पासबुकमध्ये पीपीओ नंबर नसतो, अशावेळी समस्या होऊ शकते.
यामुळे पेन्शन जारी होण्यास उशीर होऊ शकतो. (EPFO-PPO)

याशिवाय, जर तुमच्या पेन्शनसंबंधी एखादी तक्रार ईपीएफओमध्ये नोंदवायची असेल तर तिथे सुद्धा पीपीओ नंबर देणे अनिवार्य आहे. ऑनलाइन पेन्शन स्टेटस जाणून घेण्यासाठी सुद्धा पीपीओ नंबरची आवश्यकता असते.

हे देखील वाचा

Pune News | ‘त्यांच्या घरात पाणी देण्याचा माझा जो मानस आहे तो निश्चित पूर्ण करेल’ – अमोल बालवडकर

ICC Tournaments Schedule | भारत दोन वर्ल्ड अन् चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे करणार आयोजन, ICCची मोठी घोषणा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : EPFO-PPO | epfo ppo number get it with bank account and pf number check know how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update