Michael Vaughan | भारताला नावं ठेवणाऱ्या क्रिकेटरला ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूने झापले

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Michael Vaughan | नुकत्याच पार पडलेल्या T -20 वर्ल्ड कपमध्ये (T-20 World Cup) इंग्लंडचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये होता. सर्वात आधी इंग्लंडच्या (England) संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. पण उपांत्य फेरीत त्याला न्यूझीलंडच्या संघाकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडच्या संघाने ऑस्ट्रेलियाला (Austrelia) साखळी सामन्यात सहज धूळ चारली होती. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला कोणीही हरवू शकणार नाही, असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. पण ऑस्ट्रेलियाच्या संघाने T -20 विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅडम झम्पा (Adam Zampa) याने भारतीय संघाला नेहमी नावं ठेवणाऱ्या मायकल वॉनवर (Michael Vaughan) खोचक शब्दात टीका करत चांगलेच झापले आहे.

ADV

मायकल वॉन हे कायम भारतीय क्रिकेट संघाला नावं ठेवत असतात.
मायकल वॉन (Michael Vaughan) या अगोदर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघ मोठ्या फरकाने पराभूत होईल असं तो म्हणाला होता.
पण त्याचा तो अंदाज पूर्णपणे चुकला होता.
वर्ल्ड कपच्या अगोदर यंदाच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या संघाला विजयाची संधी नाही.
T -20 विश्वचषकाआधी त्यांनी अनेक मालिकांमध्ये पराभव स्वीकारला आहे.
ग्लेन मॅक्सवेलची कामगिरी दमदार असल्याने तो कदाचित दमदार खेळ करेल, पण इतर खेळाडूंना फारशी चमक दाखवता येणार नाही.
ऑस्ट्रेलियाला विजेतेपदाचा चान्स नाहीच… इंग्लंड, भारत, विंडिज, न्यूझीलंड किंवा कदाचित पाकिस्तान”
असा अंदाज मायकल वॉन यांनी व्यक्त केला होता पण यावेळीसुद्धा त्यांचा अंदाज चुकला.
ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा बॉलर अ‍ॅडम झम्पा याने एक फोटो ट्विट करून त्याखाली मायकल वॉनचे शब्द कॅप्शनमध्ये वापरून त्याची खिल्ली उडवली आहे.

ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मायकल वॉनने ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन केले आहे.
मायकल वॉनने आपल्या ट्विटमध्ये ऑस्ट्रेलियाने T -20 चॅम्पियन होणं ही खूप मोठी गोष्ट आहे.
इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला सहज पराभूत केलं होतं. त्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाने दिमाखात कमबॅक केलं.
मिचेल मार्श (Mitchell Marsh) हा सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे.
त्यामुळे त्याने त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ केल्याचा मला आनंद आहे.
येत्या काळात होणाऱ्या ऍशेस कसोटी मालिकामध्येही तो चांगला खेळ करेल अशी अपेक्षा आहे असे मत व्यक्त केले आहे.

 

Web Title : Michael Vaughan | michael vaughan statement backfired australia adam zampa slammed india hater

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Rohit Sharma | टीम इंडियाला जिंकण्यासाठी काय करावे लागणार; रोहितने सांगितला फॉर्म्युला

Reserve Bank Of India | रिझर्व्ह बँकेने 100 पेक्षा जास्त अनावश्यक सर्क्युलर माघारी घेतले

Pune News | पुण्यातील पत्रकार राजेंद्र येवलेकर यांचे निधन