EPFO न दिलं 64 लाख लोकांना गिफ्ट, आता घरबसल्या जमा करा ‘हे’ प्रमाणपत्र, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जर आपण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) पेन्शनर आहात तर आपल्यासाठी एक नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत आपण घरबसल्या लाइफ सर्टिफिकेट सादर करू शकणार आहात.

जे पेन्शनधारक असतात त्यांना दरवर्षी लाइफ सर्टिफिकेटच्या माध्यमातून हयात असण्याचा पुरावा द्यावा लागतो. या कारणामुळेच पेन्शनधारक ईपीएफओ मध्ये लाइफ सर्टिफिकेट जमा करत असतात.

पूर्वी ही सुविधा फक्त ऑफलाईन होती, परंतु अलीकडे ईपीएफओने ऑनलाईन लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार पेन्शनधारक आता आपल्या सुविधेनुसार वर्षभरात कोणत्याही वेळी ऑनलाईन माध्यमातून लाइफ सर्टिफिकेट जमा करू शकणार आहेत.

हे लाइफ सर्टिफिकेट सादर करण्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी वैध राहत असते. दरवर्षी हे लाइफ सर्टिफिकेट जमा करणे बंधनकारक आहे.

देशभरातील सुमारे ६४ लाख लोकांना दरवर्षी लाइफ सर्टिफिकेट जमा करावे लागते. म्हणजेच या लोकांना ईपीएफओच्या नवीन सुविधेचा फायदा मिळणार आहे.

जर आपण लाइफ सर्टिफिकेट जमा केले नाही तर आपली पेन्शन थांबवली जाऊ शकते.