EPFO Update | आता राहणार नाही पेन्शनचे टेन्शन, ईपीएफओने सुरू केला ‘हा’ नवीन उपक्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ईपीएफओ (EPFO Update) ने पेन्शनधारकांना (Pensioners) होणारा त्रास कमी करण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत घेतलेल्या पुढाकाराअंतर्गत ईपीएफओकडून सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना काही नवीन सुविधा दिल्या जात आहेत. ईपीएफओने केवळ जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) सादर करण्याची डेडलाईन (Deadline) हटवली नाही, तर आता कर्मचार्‍यांना निवृत्तीच्या दिवशीच ’पेन्शन पेमेंट ऑर्डर’ देण्याची व्यवस्था केली आहे. (EPFO Update)

 

वेबिनार करत आहेत ईपीएफओची प्रादेशिक कार्यालये

ईपीएफओने अलीकडील Tweet मध्ये म्हटले आहे, ईपीएफओद्वारे ’अखंड सेवा’: सदस्य निवृत्तीच्या दिवशी पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) मिळवू शकतील. सर्व प्रादेशिक कार्यालये ’प्रयास, सेवानिवृत्तीच्या दिवशी पीपीओ जारी करण्याचा प्रयत्न’ या विषयावर मासिक वेबिनार आयोजित करत आहेत.

तीन महिन्यांच्या आत निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांना वेबिनारमध्ये नियोक्त्यांसोबत मार्गदर्शन आणि प्रशिक्षणासाठी आमंत्रित केले जात आहे. या उपक्रमाचा लाभ दरवर्षी निवृत्त होणार्‍या सुमारे 3 लाख कर्मचार्‍यांना होणार आहे. (EPFO Update)

 

कधीही जमा करा जीवन प्रमाणपत्र
ईपीएफओने सांगितले होते की आता पेन्शनधारक (Pensioners) संपूर्ण वर्षात कधीही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात, जे पुढील एक वर्षासाठी वैध असेल. निवृत्ती वेतनधारकांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) सादर करावे लागते. असे करण्यात अयशस्वी झाल्यास तुम्हाला पेन्शन थांबवण्याचा धोका असतो.

EPFO च्या मते, EPS 95 चे निवृत्तीवेतनधारक कोणत्याही मुदतीशिवाय वर्षातून कधीही त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. हे प्रमाणपत्र सादर केल्याच्या तारखेपासून पुढील एक वर्षासाठी वैध असेल. म्हणजेच, जर एखाद्या पेन्शनधारकाने 15 एप्रिल 2022 रोजी त्याचे जीवन प्रमाणपत्र सादर केले, तर पुढील वेळी त्याला 15 एप्रिल 2023 पूर्वी कधीही जीवन प्रमाणपत्र सादर करता येईल.

खासगी क्षेत्रातील या कर्मचार्‍यांना दिलासा
ईपीएस 95 च्या या योजनेच्या कक्षेत खाजगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांना (Private Sector Employees) पेन्शनचा लाभ मिळतो.
ईपीएफओने डिसेंबर 2019 मध्ये अशा कर्मचार्‍यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे नियम बदलले होते.

यासह, ईपीएफओने दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे बंधन हटवले आणि लाभार्थ्यांना ते वर्षभरात कधीही सादर करण्याची लवचिकता दिली.
ईपीएफओच्या या नव्या उपक्रमामुळे खाजगी क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

Web Title :- EPFO Update | epfo latest update ppo pension payment order private sector pensioners new facility

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा