SBI Hikes Interest Rates on FDs | | SBI ग्राहकांसाठी महत्वाची माहिती ! मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI Hikes Interest Rates on FDs | स्टेट बँक ऑफ इंडीयाकडून (State Bank of India) आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक महत्वाची माहिती देण्यात येत आहे. SBI ने दोन कोटी अथवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या देशांतर्गत मुदत ठेवीवरील व्याजाच्या किमतीत (Domestic Bulk Term Deposits) वाढ करण्यात आली आहे. यात बल्क मुदत ठेवी या 40 – 90 बीपीएसने वाढल्या आहेत. विशेष म्हणजे आजपासून (मंगळवार) नवे दर (SBI Hikes Interest Rates on FDs) जारी करण्यात आले. अशी माहिती अधिकृत वेबसाइटवर दिली आहे.

 

मार्चमध्येच बँकेने मोठ्या प्रमाणात मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली होती. आता बँकेने 7 ते 45 दिवसांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर 3 टक्क्यांवर ठेवला आहे. तर 46 ते 179 दिवसांसाठी तो 3 टक्क्यांवरून 3.5 टक्के केला आहे. 180 ते 210 दिवसांच्या कालावधीत ठेवींवरील व्याजदरात 40 बेसिस पॉइंट्सने वाढ केलीय. 211 दिवसांपासून ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदर 3.3 टक्क्यांवरून 3.75 टक्के केला आहे.

दरम्यान, एसबीआयने 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवरील व्याजदर 3.6 टक्क्यांवरून 4 टक्के केलाय. 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर 3.6 टक्क्यांवरून 4.25 टक्क्यांपर्यंत वाढ केलीय. तसेच, 64 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. बँकेने 3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी आणि 5 वर्ष ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 3.6 टक्क्यांवरून 4.5 टक्के व्याजदर वाढवण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना नियमित दरापेक्षा 0.50 टक्के अतिरिक्त दर दिला जाईल. असं सांगण्यात आलं आहे.

 

Web Title :- SBI Hikes Interest Rates on FDs | sbi hikes interest rates on fixed deposits sbi fd new rates

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा