Essential Vitamin | उत्तम आरोग्य आणि फिटनेससाठी अतिशय आवश्यक आहेत ‘हे’ 10 व्हिटॅमिन, जाणून घ्या – कोणत्या फूड्सद्वारे मिळेल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – उत्तम आरोग्यासाठी चांगला आहार आवश्यक आहे. चांगला आहार म्हणजे असे पदार्थ ज्यामध्ये आरोग्यासाठी आवश्यक असलेली सर्व जीवनसत्त्वे (Essential Vitamin) असतात. शारीरिक (Physical Health) आणि मानसिक आरोग्य (Mental Health) सुधारण्यासाठी आपल्या शरीराला 10 आवश्यक जीवनसत्त्वांची (Essential Vitamin) गरज असते. या 10 जीवनसत्त्वांमध्ये A, B, C, D, E, K जीवनसत्त्वांचा समावेश आहे. यात थायमिन (B1), रिबोफ्लेविन (B2), नियासिन (C3), पॅन्टोथेनिक अ‍ॅसिड (B5), पायरॉक्सिडीन (B6), बायोटिन (B7), फोलेट (B9) आणि कोबालामिन (B12) देखील असतात.

 

या सर्व जीवनसत्त्वांच्या (Essential Vitamin) यादीत अशी 4 जीवनसत्त्वे आहेत जी चरबीमध्ये विरघळणारी असतात आणि शरीरात साठून राहतात, उर्वरित विद्राव्य जीवनसत्त्वे लघवीद्वारे शरीरातून बाहेर पडतात. या सर्व जीवनसत्त्वांची शरीरात विशेष भूमिका असते. त्यांच्या पूर्ततेसाठी, कोणत्याही औषधाची आवश्यकता नाही, परंतु ती काही पदार्थांमधून सहज मिळू शकतात. कोणते पदार्थ कोणती जीवनसत्त्वे देतात ते जाणून घेवूयात…

 

1. व्हिटॅमिन ए (Vitamin A) –
व्हिटॅमिन ए रोगप्रतिकार शक्ती (Immunity) मजबूत करते, तसेच त्वचा (Skin), केस (Hairs) आणि डोळ्यांच्या (Eye) आरोग्यासाठी उपयुक्त आहे. हे जीवनसत्व तुम्हाला गाजर (Carrots), दूध (Milk), मासे (Fish), अंड्यातील पिवळा बलक (Egg Yolk), फोर्टिफाईड डेअरी उत्पादनांमधून (Fortified Dairy Products) मिळू शकते.

 

2. व्हिटॅमिन बी 1 (Vitamin B1) –
हे आवश्यक जीवनसत्व चयापचय (Metabolism) वाढवते. हे पचन करण्यास मदत करते, भूक आणि मज्जातंतूंचे योग्य कार्य करण्यास मदत करते. हे जीवनसत्व मिळविण्यासाठी आहारात शेंगा (Legumes), काजू (Cashews), बिया (Seeds) आणि धान्ये (Grains) यांचे सेवन करावे.

3. व्हिटॅमिन बी 2 (Vitamin B2) –
हे आवश्यक जीवनसत्व दृष्टी वाढवते, तसेच त्वचा निरोगी ठेवते. हे मिळवण्यासाठी, आपल्या आहारात मजबूत तृणधान्ये (Cereals), दुग्धजन्य पदार्थ (Dairy Products), सोया (Soy), तांदूळ (Rice) आणि कच्चे मशरूम (Raw Mushrooms) समाविष्ट करा.

 

4. व्हिटॅमिन बी 3 (Vitamin B3) –
हे जीवनसत्व चयापचय सुधारते, तसेच पचन व्यवस्थित ठेवते. हे साध्य मिळवण्यासाठी आहारात मशरूम (Mushrooms), मांस (Meat), मासे आणि सीफूडचे (Seafood) सेवन करा.

 

5. व्हिटॅमिन बी 12 (Vitamin B12) –
हे आवश्यक जीवनसत्व मज्जासंस्था (Nervous System) सुधारते, हे मिळवण्यासाठी आहारात मांस आणि अंडी (Eggs) सेवन करा.

 

6. व्हिटॅमिन बी 7 (Vitamin B 7) –
व्हिटॅमिन बी 7 चयापचय मजबूत करते. हे जीवनसत्व मिळवण्यासाठी अंड्यातील पिवळा बलक, सोयाबीन (Soybeans), संपूर्ण धान्य, नट (Nuts) आणि यीस्ट (Yeast) यांचा आहारात समावेश करा.

 

7. व्हिटॅमिन बी 9 (Vitamin B 9)-
हे जीवनसत्व गर्भवती महिलांसाठी खूप महत्वाचे आहे. बाळाच्या आणि आईच्या चांगल्या आरोग्यासाठी या व्हिटॅमिनचे सेवन करणे खूप महत्वाचे आहे. हे मिळवण्यासाठी आहारात कलेज, यीस्ट, पालेभाज्या (Leafy Vegetables), संत्र्याचा रस (Orange Juice), फोर्टिफाइड मैदा (Fortified Flour), एवोकॅडो (Avocado) आणि शेंगा खा.

 

8. व्हिटॅमिन सी (Vitamin C) –
हे इम्युनिटी वाढवणारे जीवनसत्व मिळविण्यासाठी आहारात आंबट आणि रसाळ फळे खा. खरबूज (Melon), बेरी (Berry),
मिरची (Chili), ब्रोकोली ( Broccoli), बटाटे ( Potato), लिंबू (Lemon), आवळा (Amla), पपई ( Papaya),
कोबी (Cabbage) आणि आंबा (Mango) हे व्हिटॅमिन सीचे उत्कृष्ट स्रोत आहेत.

9. व्हिटॅमिन डी (Vitamin D) –
हाडे आणि दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी हे जीवनसत्व आवश्यक आहे. शरीरात कॅल्शियमचे शोषण वाढवते,
हे मिळवण्यासाठी आहारात दूध, फोर्टिफाइड सोया, तांदूळ पेय, लोणी (Butter), अंड्यातील पिवळा बलक,
फॅटी फिश (Fatty Fish), सूर्यप्रकाश (Sunlight) हे खूप महत्वाचे आहे.

 

10 व्हिटॅमिन के (Vitamin K) –
व्हिटॅमिन के रक्त गोठण्यास उपयुक्त आहे, हे जीवनसत्व मिळविण्यासाठी आहारात पालक (Spinach),
ब्रोकोली (Broccoli) आणि हिरव्या पालेभाज्या खाव्यात.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Essential Vitamin | if you want to stay healthy so include these 10 essential vitamin in your diet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | ‘…अब बरबाद भी हम करेंगे, भाजपचे साडेतीन लोक कोठडीत जाणार’ – संजय राऊत

 

EPFO Facility | पीएफ अकाऊंटमधून विम्याचा हप्ता देखील भरता येतो, जाणून घ्या ‘ईपीएफओ’च्या सुविधेबाबत

 

Modi Government | मोदी सरकारने आणखी 54 अ‍ॅप्सवर आणली बंदी, नवीन प्रतिबंधामध्ये चीनी अ‍ॅप्सचा सुद्धा समावेश