कामगारांसाठी खुशखबर ! 10 मिनिटे जास्त काम सुद्धा मानला जाईल ‘ओव्हरटाइम’, कंपन्यांना करावे लागेल ‘या’ गोष्टींचे सक्तीने पालन, जाणून घ्या

नवी दिल्ली : सरकारद्वारे लवकरच कामगारांसाठी नवीन वेज कोड अंमलात आणण्याची तयारी केली जात आहे. या अंतर्गत कामगारांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातील. यानुसार कमाल कामाचे तास 12 करण्याचा प्रस्ताव आहे. नियमानुसार, एखाद्या कर्मचार्‍याने 15 ते 30 मिनिटापर्यंत जास्त काम केल्यास, त्यास 30 मिनिटांचा ओव्हरटाइम समजला जाईल, ज्यासाठी कमचार्‍याला जादा पैसे दिले जातील.

याशिवाय, ड्राफ्ट नियमांनुसार, कुणीही कर्मचारी ज्याने लागोपाठ 5 तास काम केले असेल, त्यास अर्ध्यातासाचा आराम दिला पाहिजे. कोणत्याही वर्करसाठी 5 तासापेक्षा जास्त वेळेपर्यंत लागोपाठ काम करून घेणे निषिद्ध आहे. नव्या कामगार कायद्यात कंपन्यांना हे ठरवावे लागेल की, सर्व कर्मचार्‍यांना पीएफ आणि ईएसआय सारख्या सुविधा मिळतील.

जर एखादी कंपनी असे करत नसेल तर तिच्यावर अ‍ॅक्शन घेतली जाऊ शकते. अशावेळी सर्व कंपन्यांना नवीन वेज कोड फॉलो करावा लागेल. मंत्रालयाने नवीन कामगार कायद्यावर सर्व हितधारकांचे विचार, सूचना आणि टिप्पणी मागवण्यासह विचार सुद्धा केला आहे.

सरकारने 29 केंद्रीय लेबर कायद्यांना एकत्र करून 4 नवीन कोड बनवले आहेत. यांचे नाव आहे इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड, कोड ऑन ऑक्