दुर्देवी ! कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊनही 25 वर्षीय पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

सीकर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचे दोन डोस घेऊनही 25 वर्षीय पोलीस कर्मचा-याचा कोरोनामुळे गुरुवारी (दि. 23) मृत्यू झाला आहे. राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. त्याच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बनवारी लाल भींचर (वय 25 रा. तारापुरा ) असे मृत्यू झालेल्या कर्मचा-याचे नाव आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याला कोरोनाची लागणही झाली होती. मात्र, उपचारानंतर तो बरा झाला. यानंतर, त्याला नेचवा पोलिस ठाण्यात तैनात केले होते. काही दिवसांपूर्वी त्यांची पोस्टिंग पोलिस लाईनवर केली होती. महत्वाचे म्हणजे फ्रंटलाइन वर्कर म्हणून त्याने लसीचे दोन्ही डोसही घेतले होते. मात्र, बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांची प्रकृती अचानक खालावली.

पोलीस सहकाऱ्याने त्याला तात्काळ एसके रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालात तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. गुरुवारी त्याचे पार्थिव तारापुरा गावात आणण्यात आले. त्यानंतर पीपीई किट परिधान केलेल्या निवडक लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. मृत बनवारी लाल 2013 मध्ये पोलिस दलात दाखल झाला होता. तर 2017 मध्ये त्याचे लग्न झाले होते. दोन वर्षाच्या मुलाचा तो बाप होता.