Ex Servicemen Wife Pune | माजी सैनिकांच्या पत्नींनी अधिक्षीका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ex Servicemen Wife Pune | जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय पुणे (District Soldier Welfare Office Pune) यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सैनिकी मुलींचे वसतिगृह नवी पेठ पुणे (Army Girls Hostel Navi Peth Pune) येथे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने अशासकीय वसतिगृह अधिक्षीकेचे एक पद भरण्यात येणार असून माजी सैनिकांच्या पत्नींनी १४ जून २०२३ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी एस.डी. हंगे (D.S. Hange) यांनी केले आहे. (Ex Servicemen Wife Pune)

 

या पदाकरिता माजी सैनिक विधवा पत्नीस प्रथम प्राधान्य देण्यात येईल. हे निवासी पद असून एकत्रित मासिक मानधन रक्कम २९ हजार ८३५ एवढे आहे. इतर अटी, शर्ती व सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या ०२०-२६१२२२८७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही श्री. हंगे यांनी कळविले आहे

 

 

Advt.

Web Title :  Ex Servicemen Wife Pune | Ex-servicemen’s wives are urged to apply for the
post of Superintendent in District Soldier Welfare Office Pune For Army Girls Hostel Navi Peth

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा