हैदराबाद पोलिसांची ‘कामगिरी’ उत्कृष्ट ! ‘एन्काऊंटर’ स्पेशालिस्टअधिकाऱ्याच ‘समर्थन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महिला डॉक्टरांवर सामुहिक बलात्कार व त्यानंतर तिला जिवंत जाळून खुन करणाऱ्या आरोपींचा हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटर करुन उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशी शब्दात एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी या घटनेचे स्वागत केले आहे.

मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा हे एकाऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या कार्यशाळात दीडशेहून अधिक एकाऊंटर करुन मुंबईतील गुन्हेगारी टोळ्यांवर चाप बसविला होता. प्रदीप शर्मा यांनी सांगितले की, हैदराबाद पोलिसांनी केले ते योग्यच केले आहे. पोलीस कधीही कोणाला मारावे, म्हणून एन्काऊंटर करत नाही.

आता कायदे खूप कडक झाले आहेत. मोक्का सारख्या कारवाईनंतर गुन्हेगारांना वर्षानुवर्षे जामीनही मिळत नाही. त्यामुळे पोलीस अनेकदा गुन्हेगारांना पकडण्यासाठी ते गेले असताना त्यांच्या तावडीत सापडू नये, म्हणून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. पोलिसांच्याच अंगावर गोळीबार करतात. त्यावेळी पोलिसांना गोळीबार करण्याशिवाय पर्यायच नसतो. हैदराबाद पोलिसांनी केले ते योग्य केले. या घटनेमुळे देशभरात तीव्र संताप होता. त्यामुळे पोलिसांच्या कृत्याचे स्वागत केले जात आहे.

Visit : Policenama.com