एक्सप्रेसवे वरील प्रवासाची बचत करणाऱ्या विस्तारीकरणाचे काम होणार सुरु

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन 

पुणे-मुंंबई प्रवासाच्या वेळेत किमान २५ मिनिटांची बचत करतानाच घाटमार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने सहाय्यभूत ठरणाऱ्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेच्या विस्तारीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला नोव्हेंबर महिन्यात सुरुवात होणार आहे. सुमारे साडेपाच हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प पुढील दोन ते तीन वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, संबंधित कंत्राटदाराला वर्क आॅर्डरही देण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7d8321db-c47a-11e8-af72-79d2b8ccd660′]

सन २०११ मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा प्रकल्प आखला होता. दरडप्रवण क्षेत्रातील वाहतुकीचा ओघ कमी करतानाच घाटमार्गात होणारी वाहतूक कोंडी दूर करणे हे या प्रकल्पाचे मुख्य लक्ष्य आहे. दोन बोगदे व उड्डाणपुलांमुळे घाटमागार्तील वाहनांना शॉर्टकट उपलब्ध होणार आहे. सध्या घाटमार्गात कमालीची वाहतूक कोंडी होते. शनिवारी व रविवारी तर वाहनांच्या लांबलचक रांगा लागतात. दोन बोगदे आणि उड्डाणपुलांमुळे हे चित्र संपुष्टात येणार आहे.

बदला घेण्यासाठी त्याने चोरली वाहतूक पोलिसांची (Traffic Police) बाईक

मुंबई-पुणे मार्गावर खोपोली ते खंडाळा घाटमार्गात नवीन मार्गिका. खोपोली एग्झिट ते सिंहगड संस्था हे अंतर सध्या १८ किमी आहे. विस्तारीकरणानंतर ते १२ किमी होईल. म्हणजेच मुंबई-पुणे दरम्यानचे अंतर ६ किमीने कमी होईल. प्रवासाच्या वेळेत २० ते २५ मिनिटांची बचत होईल.

[amazon_link asins=’B07C23X8C4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’29496fba-c47b-11e8-97a8-1dfb9bcd0f06′]

खोपोली एग्झिट ते सिंहगडदरम्यान आठ पदरी मार्गिका. खालापूर टोलनाक्यापासून खोपोली फूड मॉलपर्यंत १४ पदरी मार्गिका. त्यात अंडरपास, ओव्हरपास, नदी पूल यांचे १४ पदरी रूंदीकरण. खालापूर फूड मॉल ते प्रस्तावित खोपोली इंटरचेंजपर्यंत आठ पदरी उंच पूल. या प्रकल्पांतर्गत ८ किमी लांबीच्या प्रत्येकी चार पदरी दोन समांतर बोगद्यांची बांधकामे पहिल्यांदाच भारतात होत आहेत. २०० मीटर उंचीचे व प्रत्येकी ८०० मीटर लांबीचे दोन पूल. एक्स्प्रेस-वेवरील घाटमार्गात रूंदीकरण प्रस्तावित नाही. त्यामुळे बांधकाम चालू असतानाही वाहतूक सुरळीत सुरू राहील. विस्तारातील बोगदा व उंच पुलांमुळे पावसाळ्यात दरड कोसळण्याची भीती राहणार नाही.

[amazon_link asins=’B0722LHYDW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4ebf51f2-c47c-11e8-9935-1f2c1e9ce405′]

सध्या घाटमार्गात वाहने कमी वेगाने जातात. या टप्प्यात प्रदूषणही जास्त आहे. विस्तारीकरणामुळे वाहतूक कोंडी टळेल. वाहनांचा वेग वाढेल. प्रदूषण कमी होईल. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ५५०० कोटी असणार आहे़

जाहिरात