‘वारीत साप सोडणार’ हे संभाषण नेमकं कोणाचे ते उघड करा : अजित पवार

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन-

आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय विठ्ठलाची पूजा करु देणार नाही असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी वारीत साप सोडण्याचा डाव असल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले होते. मात्र असे काही संभाषण मराठा बांधवांनी केले असेल यावर आपला कधीच विश्वास नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

[amazon_link asins=’B01LXHKR4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8db6076a-923c-11e8-9060-ad4e09312413′]

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदरचे संभाषण आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. यावर बोलताना अजित पवार यांनी म्हटले आहे की, जर असे काही संभाषण असेल तर त्यांनी ते सार्वजनिक करावे , पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे आव्हान दिले आहे.

एवढेच नाही तर आज होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीला मी आणि धनंजय मुंडे जाणार असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावर देखील आपली भूमिका मांडली आहे. राज्यात मागील आठवड्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळाले या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलना दरम्यान तिघांचा मृत्यू देखील झाला आहे. एकंदर ही संपूर्ण परिस्थिती पाहता, आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्ष गटनेत्याची बैठक घेतली जाणार आहे.