पोलीस उपायुक्तालयात स्फोटके सापडल्याने खळबळ

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन

कल्याणच्या पोलीस उपायुक्त कार्यालयासोमोर एका रिक्षात स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे. रिक्षामध्ये स्फोटके असल्याची माहिती पोलिसांना एका निनावी चिठ्ठीमुळे समजले. पोलिसांच्या हाती ही चिठ्ठी पडताच आयुक्तालयातील पोलिसांची चांगली भांबेरी उडाली. हा सर्व प्रकार शुक्रवारी (दि.२८) घडला.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d4641feb-c3d2-11e8-8c00-a7de5a04edfb’]

पोलिसांना चिठ्ठी मिळाल्यानंतर उपायुक्त कार्यालयातील पोलिसांनी रिक्षाचा शोध सुरु केला. तसेच बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले. पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या एका रिक्षाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी रिक्षामध्ये चार डीटोनेटर आणि दोन जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. पोलीस उपायुक्त कार्यालयासह तीन महत्वाची शासकीय कार्यालये असलेल्या इमारतीच्या आवारात स्फोटके सापडल्याने एकच खळबळ उडाली.

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात एका इमारतीमध्ये तीन महत्वाची शासकीय कार्यालये आहेत. या इमारतीच्या तळमजल्यावर पोलीस उपायुक्त कार्यालय, पहिल्या मजल्यावर निवडणूक कार्यालय, दुसऱ्या मजल्यावर प्रांत कार्यालय आहे. अशा महत्वाच्या इमारतीच्या आवारातच स्फोटके सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. एका रिक्षामध्ये अंबरनाथ तालुक्यातील वसाद गावात राहणाऱ्या तीन शेतकरी महिला जमिनीच्या वादाप्रकरणी प्रांत कार्यलयात आल्या होत्या. या महिला ज्या रिक्षातून आल्या होत्या त्याच रिक्षात स्फोटके आढळली आहेत. त्यामुळे तीन महिला आणि रिक्षा चालकाला फसविण्यासाठी ही स्फोटके रिक्षात ठेवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी स्फोटके जप्त करत पुढील तपास सुरु केला आहे.
[amazon_link asins=’B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d9ece6a0-c3d2-11e8-8ed3-efca178134b9′]

मित्रांनीच केली तरुणाची हत्या

रोहा : शहरातून बेपत्ता झालेल्या तरुणाची हत्या त्याच्याच मित्रांनी केली असून, या प्रकरणी रोहा पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी जागृत संदीप मोरे (१८, रा. रोठ खु.) मित्रांसोबत घराबाहेर पडला होता. मात्र, तो घरी न परतल्याने त्याच्या वडिलांनी रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर रोहा-तांबडी मार्गावरील जंगल भागात निर्जनस्थळी तरुणाचा मृतदेह आढळला.
[amazon_link asins=’B071CY6D29′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e117c5cd-c3d2-11e8-8f3d-6d953558e015′]

हत्येच्या या घटनेमुळे संपूर्ण रोहे तालुक्यात खळबळ उडाली. जागृत मोरे हा मित्रांसोबत बुधवार, २६ सप्टेंबर रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्याच्या वडिलांनी रोहा पोलिसांत हरविल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, रोहा-तांबडी मार्गावर हनुमान टेकडीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या निर्जनस्थळी त्याचा मृतदेह आढळला. मारेकऱ्यांनी दगडांनी तरुणाचा चेहरा ठेचला होता.

या प्रकरणी पोलिसांनी सतीश संजय मोरे (रा. रोठ खु.), सुनील अंकुश कांबळे (रा. वरसे) या दोघांना ताब्यात घेतले आहे. जुगार खेळण्यासाठी गळ्यातील सुमारे एक लाख रुपये किमतीची चेन मित्रांना देण्यास नकार दिल्याने ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पुणे पोलीस आयुक्तालयात (CP OFFICE) आग : पाेलिसांची धावपळ