पोलिस महासंचालक दत्‍ता पडसलगीकर यांना मुदतवाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राज्य पोलिस दलाचे पोलिस महासंचालक दत्‍ता पडसलगीकर हे सेवाज्येष्ठतेनुसार ऑगस्ट अखेरीस निवृत्‍त होणार असले तरी त्यांना राज्य सरकार मुदतवाढ देणार असल्याचे वृत्त पोलीसनामाने सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. पोलीसनामाचे हे वृत्त खरे ठरले असून पोलिस महासंचालक दत्‍ता पडसलगीकर यांना सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता नोव्हेंबर २०१८ पर्यंत पडसलगीकर हेच पोलिस महासंचालक म्हणुन कार्यरत राहणार आहेत. मंत्रीमंडळाच्या नियुक्ती समितीने मंगळवारी पडसलगीकर यांच्या मुदतवाढीचा निर्णय जाहीर केला आहे.
[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7dd8175a-aae0-11e8-ab94-f757cf920176′]

पडसलगीकर यांची जवळपास 36 वर्षाची निष्कलंक सेवा लक्षात घेवुन राज्य सरकारच्या गृह विभागाने त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये पोलिस महासंचालक पदावर कार्यरत असलेल्या अधिकार्‍यास राज्य सरकारने मुदतवाढ दिली नाही. माजी पोलिस महासंचालक प्रविण दीक्षित यांना देखील मुदतवाढ मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली होती. मात्र, ऐनवेळी त्यांना मुदतवाढ देण्यात आली नाही. किंबहुना दीक्षित यांनी मुदतवाढ मागितली नाही. दीक्षित यांच्यानंतर राज्य पोलिस दलाची धुरा वरिष्ठ आयपीएस अधिकारी सतीश माथुर यांच्याकडे सोपविण्यात आली. माथुर हे जूनअखेरीस सेवानिवृत्‍त झाले. त्यानंतर मुंबईच्या आयुक्‍तपदी कार्यरत असलेले दत्‍ता पडसलगीकर यांची पोलिस महासंचालकपदी नियुक्‍ती करण्यात आली. पडसलगीकर हे सन 1982 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्यानंतर सेवाज्येष्ठतेमध्ये 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे पोलिस आयुक्‍त सुबोध जयस्वाल यांचा नंबर लागतो.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’908b6267-aae0-11e8-b527-b544be5d6334′]

फेब्रुवारी अखेरीस पडसलगीकर निवृत्‍त झाल्यानंतर सुबोध जयस्वाल यांची पोलिस महासंचालकपदी नियुक्‍ती केली जाईल तर मुंबईच्या आयुक्‍तपदी सन 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी संजय बर्वे यांची नियुक्‍ती होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, मुंबईच्या आयुक्‍तपदी विराजमान होण्यासाठी इतर वरिष्ठ आयपीएस अधिकारी उत्सुक आहेत. युती सरकारच्या काळात एकाही आयपीएस अधिकार्‍यास मुदतवाढ देण्यात आलेली नाही. आघाडी सरकारच्या काळात मुंबईचे माजी पोलिस आयुक्‍त धनंजय जाधव आणि माजी पोलिस महासंचालक पी.एस. पसरिचा यांना मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर एकाही अतिवरिष्ठ पोलिस अधिकार्‍यास मुदतवाढ देण्यात आल्याचे उदाहरण नाही.

पोलिस महासंचालक दत्‍ता पडसलगीकर यांना मुदतवाढ ?

कार्यकाल संपल्यानंतर एखाद्या अधिकार्‍यास मुदतवाढ हवी असल्यास त्यांनी संबंधित विभागाकडे आणखी काम करण्याची इच्छा असल्याचे सांगुन मुदतवाढीची मागणी करणे गरजेचे असते. सेवाज्येष्ठतेनुसार दि. 31 ऑगस्ट रोजी पडसलगीकर हे निवृत्‍त होणार आहेत. मात्र, राज्यात एटीएसची सुरु असलेली कारवाई असो की पुण्यातील एल्गार परिषदेशी संबंधीत देशभरात महाराष्ट्र पोलिसांकडून सध्या छापेमारी आणि धरपकड सुरु आहे. यापैकी चार जणांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. याच सर्व महत्वाच्या पार्श्वभूमीवर पडसलगीकर यांची निवृत्ती पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वाचा आजच्या टॉप बातम्या