दिवाळीनिमित्त एसटीच्या ९ हजार ३०० जादा गाड्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

दिवाळीच्या सणात प्रवाशां सोयीसाठी एसटीने १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या दरम्यान महाराष्ट्रातील विविध बसस्थानकांमधून एसटीच्या नियोजित फेऱ्या वगळून ९ हजार ३२० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परतीच्या प्रवासासाठी १० ते २० नोव्हेंबरपर्यंत  जादा बस उपलब्ध असतील. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती या मंडळातून जादा बस सोडण्यात येणार आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’97efb1b9-c91e-11e8-93fe-63a4c10f2aab’]

या जादा फेऱ्यांचे आगाऊ आरक्षण सध्या उपलब्ध करण्यात आले आहे. सणासुदीला गर्दीचा त्रास टाळण्यासाठी प्रवाशांनी वेळेत आरक्षण करुन आपले आसन निश्चित करावे, असे आवाहन एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले आहे.

दिवाळीनिमित्त नोकरदार, कामगारवर्ग, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असते. या दरम्यान प्रवासी संख्येत मोठी वाढ होत असते. त्यामुळे नेहमीच एसटीवर या प्रवाशांचा भार वाढत असतो. सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांकडून एसटी बसलाच पसंती दिली जाते. दिवाळी सणाच्या कालावधीत बसस्थानके सुशोभित करण्यात येणार आहेत. जादा वाहतूक होणार असल्याने बसच्या बिघाड किंवा अपघाताची शक्यता लक्षात घेऊन फिरती दुरुस्ती व गस्त पथके तैनात करण्यात येतील. परिसरातील सर्व बसस्थानके, जादा वाहतूक नियंत्रण केंद्राच्या जागी प्रवाशांसाठी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय करण्यात येणार आहे.

होर्डिंग दुर्घटनेत रेल्वे इंजिनियर गजाआड

बसच्या स्वच्छतेकडे तसेच फेऱ्यांच्या नियमिततेकडे लक्ष पुरविण्यात येणार आहे. जादा बसवर दिवाळी जादा असा उल्लेख असणार आहे. आगार व्यवस्थपकांना जादा वाहतूक करताना मदत व्हावी म्हणून विभागीय कचेरीतील अधिकाऱ्यांची (पालक अधिकारी) नेमणूक करण्यात येणार आहे. जिल्हा मुख्यालयाच्या बसस्थानकावर गर्दीच्या कालावधीत प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रवासी मित्र बिल्ला लावलेले कर्मचारी नियुक्त करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

 [amazon_link asins=’B077S3Y5MQ,B00FRCNR6U’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a2d3a325-c922-11e8-8b24-77e8e03db5fe’]