‘कोरोना’ व्हायरसला रोखण्यासाठी ‘फेस शील्ड’ची मदत होत नाही, सुपर कॉम्प्युटर नं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना टाळण्यासाठी जगभरातील लोक फेस शील्ड देखील लावत आहेत. परंतु जपानच्या एका सुपर कॉम्प्युटरने खुलासा केला आहे की, फेस शिल्ड तुमचे कोरोना व्हायरस संक्रमणापासून संरक्षण करत नाही. कारण हवेमध्ये वाहणार्‍या आर्द्रतेच्या अगदी छोट्या थेंबांना ते रोखू शकत नाही. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी फेस शिल्ड प्रभावी नाही.

 

जपानच्या सुपर कॉम्प्युटर फुगाकूच्या (Fugaku) माध्यमातून प्लास्टिक फेस शील्डवर संशोधन केले गेले. या संशोधनात असे आढळले की, हवेतील ५ मायक्रोमीटरपेक्षा कमी थेंब प्लास्टिकच्या फेस शिल्डवरुन आपल्या श्वासोच्छवासाद्वारे शरीरात प्रवेश करतात. जर या थेंबांमध्ये कोरोना व्हायरस असेल, तर कोणीही संसर्गापासून वाचू शकत नाही.

एक माइक्रोमीटर मीटरच्या १० लाखांश आहे. कोबे येथील सरकारी संशोधन संस्था रिकेननुसार, ५० मायक्रोमीटरपेक्षा जास्त अर्ध्याहून अधिक थेंब स्वत: हवेत आपला रस्ता शोधतात. कोरोना विषाणू त्यातून छोट्या थेंबांमध्येही प्रवेश करू शकतो. त्यानंतर तो तुमच्या शरीरात प्रवेश करण्यास वेळ लागणार नाही.

रिकेनचे टीम लीडर माकोटो त्सुबोकोरा यांच्या म्हणण्यानुसार, हे संशोधन वेगवेगळ्या आकाराच्या हजारो थेंबावर केले गेले आहे. परिणामी त्यांनी मास्कला पर्याय म्हणून वापरल्या जाणार्‍या प्लॅस्टिक फेस शिल्डबाबत सावध केले आहे. ते म्हणाले की, फेस गार्ड किंवा फेस शिल्ड मास्कपेक्षा अधिक प्रभावी नाही.

माकोटोच्या म्हणण्यानुसार, एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या तोंडातून थेंब रोखण्यात फेस गार्डची प्रभावशीलता मास्कच्या तुलनेत खूपच कमी आहे. ज्या लोकांना मास्क घालण्याचा सल्ला दिला जात नाही, उदाहरणार्थ श्वसन समस्या असलेले लोक आणि लहान मुले इ. त्यांना हवेशीर ठिकाणी मास्कऐवजी फेस शील्डने घातले जाऊ शकते.