‘Facebook’चं नवीन फिचर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हाला फेसबुक वापरताना फोटो झूम करून बघण्याची सवय असेल तर  आता तुम्हाला असे करताना दहा वेळा विचार करावा लागला आहे. कारण फेसबुक इंस्टाग्राम सारखे फिचर फेसबुकवर देखील देण्याचा कंपनीने निर्णय घेतला आहे. मागील महिन्यात कंपनीने हे फिचर बाजारात आणले असून या महिन्यापासून सर्वांना हे फिचर भेटणार आहे. फेसबुकच्या iOS ऍपमध्ये अगोदरपासून हे फिचर असून यावर तुम्ही दोन वेळा टॅप केल्यानंतर त्या फोटोला थेट तुम्ही लाईक करता. त्यामुळे यापुढे फेसबुकवर देखील तुम्ही डबल टॅप केल्यास ते लाईक समजले जाईल.

सर्व ग्राहकांना हे फिचर हळू हळू देण्यात येत आहे. मात्र अँड्रॉइड युझर्सला हे फिचर कधी मिळणार याची अद्याप काहीही माहिती देण्यात आलेली नाही. फेसबुकने इंस्टाग्रामला खरेदी केल्यानंतर आता कंपनी नवनवीन फीचर्स आणत आहेत. यानंतर आता फेसबुकचा सीईओ मार्क जुकेरबर्ग हा इंस्टाग्राम, मॅसेंजर, आणि व्हॅट्सऍपला याना एका करून नवीन क्रॉस प्लॅटफॉर्म मॅसेजिंग सिस्टम तयार करण्याचा विचार करत आहे. याआधी देखील इंस्टाग्रामवरील अनेक फीचर्स फेसबुकमध्ये देण्यात आले आहेत. या फीचर्समध्ये स्टोरी फीचर हे सर्वात भारी फिचर दिले आहे.

दरम्यान, आगामी काळात देखील इंस्टाग्रामवरील अनेक फीचर्स फेसबुकवर देणार असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर फेसबुकच्या स्टोरी फीचरमध्ये जाहिराती देखील देण्यात येणार आहेत, तसेच व्हाट्सअपवर देखील हे जाहिरात फिचर लवकरच दिले जाणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त

साजूक तुपामुळे होतात ‘हे’ ५ फायदे

अवेळी मासिक पाळी येण्याची ‘ही’ ४ प्रमुख कारणं, ‘ही’ काळजी घ्या

चिडचिडेपणा ‘या’ ५ गोष्टींमुळं वाढतो, जाणून घ्या

दिवसा ‘अवेळी’ झोप येत असेल तर ‘हे’ 4 उपाय करा, जाणून घ्या

झोप न येण्या मागं ‘ही’ कारणं, ‘ही’ काळजी घ्या

डोकेदुखीला ‘या’ घरगुती उपायांनी करा ‘बाय-बाय’

गॅस सिलेंडर लीक होत असल्यास ‘सुरक्षेसाठी’ करा हे उपाय

Loading...
You might also like