Facebook नं हटवली ट्रम्प यांची पोस्ट, Covid-19 ला म्हंटलं फ्लूपेक्षा कमी ‘घातक’

वॉशिंग्टन : फेसबुकने पुन्हा एकदा अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाई करत त्यांची पोस्ट डिलिट केली आहे. स्वत: कोरोना संसर्गाने ग्रस्त असलेल्या ट्रम्प यांनी दावा केला होता की, कोविड-19 फ्लूच्या तुलनते कमी घातक आहे. यापूर्वी ट्विटरने सुद्धा अनेकदा ट्रम्प यांच्या ट्विटला फेक मार्क करून इशारा जारी केला आहे. ट्रम्प यांनी ट्विटरची भूमिका भेदभाव करणारी असल्याचा आरोप केला होता.

कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर हॉस्पीटलमध्ये तीन दिवस उपचार करण्यात आले, मात्र ट्रम्प मधूनच व्हाइट हाऊसला परतले. ते अजूनही देखरेखीखाली आहेत. सीएनएननुसार, ट्रम्प यांनी पोस्टमध्ये लिहिले होते की – अमेरिकेने फ्लू सीझनसोबत जगणे शिकले आहे, अशाच प्रकारे आम्ही कोविडसोबत जगणे शिकत आहोत, बहुतांश लोकसंख्येत हा खुप कमी घातक आहे. ट्रम्प यांनी ट्विटरवर सुद्धा हा संदेश टाकला होता, जो ट्विटरने हाइड केला आहे. त्यांच्या या ट्विटवर एक इशारा लिहिलेला दिसत आहे की, ही भ्रम निर्माण करणारी आणि संभाव्य दृष्ट्या हानिकारक माहिती असू शकते. यूजरने हा इशारा वाचल्यानंतर ट्विटवर क्लिक केले तरच त्यांना हे खरे ट्विट वाचता येईल.

फेसबुकने जारी केले वक्तव्य
फेसबुकचे धोरण संचार व्यवस्थापक अँडी स्टोन यांनी म्हटले, ’आम्ही कोविड -19 च्या गंभीरतेबाबत चुकीची माहिती हटवत आहोत, आणि आम्ही ही पोस्ट आता हटवली आहे. राष्ट्राध्यक्षांनी यावर प्रतिक्रिया देताना आणखी एक ट्विट केले आहे, सेक्शन 230चे निरसन!!!’ ते येथे त्या कायद्याचा संदर्भ देत आहेत जो सांगतो की, सोशल नेटवर्क त्यांच्या यूजरद्वारे पोस्ट केलल्या पोस्टच्या कंटेटसाठी जबाबदार नाहीत. परंतु, यामध्ये कंपनीला यूजर्सच्या भल्यासाठी तो कंटेट ब्लॉक करण्याची परवानगी असते, जो त्यांना अवमानकारक, त्रासदायक किंवा हिंसक वाटत असेल.

ही दुसरी वेळ आहे, जेव्हा राष्ट्राध्यक्षांची पोस्ट हटवण्यात आली आहे. तर ट्विटरवर अनेकदा डिलिट करणे आणि इशारा देण्यासारखी कारवाई करण्यात आली आहे. तिकडे रिपब्लिकन्सचे म्हणणे होते की, ऑनलाइन रूढीवादी विचारांच्याविरूद्ध एकतर्फी सेन्सॉरशिप लावली जात आहे. तर डेमोक्रेट्सचे म्हणणे होते की, त्यांच्या चुकीच्या माहितीसाठी जास्त रूची आहे. मागच्या आठवड्यात अमेरिकन सिनेटच्या कॉमर्सने फेसबुक, ट्विटर आणि गुगलच्या प्रमुखांना प्रकरणाच्या पुढील तपासासाठी समन्स जारी केले होते.