Facing Acne Problem | मुरुमांच्या समस्येला सहजतेने घेऊ नका, आरोग्याच्या ‘या’ 5 गडबडीचा आहे संकेत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Facing Acne Problem | मुरूमे ही एक सामान्य समस्या आहे, ज्याचा सामना अनेक पुरुष आणि महिलांना करावा लागतो. हार्मोनल असंतुलन, तणाव, चुकीचा आणि असंतुलित आहार, केसांची काळजी घेण्याची चुकीची पद्धत, इत्यादी अनेक कारणांमुळे हे होऊ शकते. (Facing Acne Problem)

 

अनेक लोकांना वाटते की, मुरुमे केवळ किशोरावस्थेत होतात. परंतु हा एक गैरसमज आहे आणि त्यात तथ्य नाही. मुरुमे 30 आणि 40 च्या वयातील लोकांना सुद्धा होऊ शकते, विशेषतः महिलांमध्ये.

 

त्वचारोगतज्ञ डॉ. आंचल पंथ यांच्या मते, या वयात मुरुमे अनेक कारणांमुळे येऊ शकतात. डॉ. पंथ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून मुरुमांशी संबंधित गोष्टी शेअर केल्या आहेत. (Facing Acne Problem)

 

डॉ. सांगतात की, मुरुमे फक्त किशोरावस्थेत होतात हा एक सामान्य गैरसमज आहे. आमच्याकडे अशा अनेक महिला येतात ज्यांना 30 आणि 40 व्या वर्षी प्रथमच मुरुमे येत आहेत. हे अनेक कारणांमुळेघडते.

 

डॉ. आंचल पंथ यांनी वयाच्या 30 आणि 40 व्या वर्षी स्त्रियांमध्ये मुरुमे येण्याची काही कारणे सांगितली आहेत, पुढील प्रमाणे –

 

1. हार्मोन असंतुलन (Hormonal Imbalance) –
डॉ पंथ सांगतात की, या वयात मुरुमे असलेल्या महिलांच्या मासिक पाळीचा इतिहास जाणून घेणे अत्यंत आवश्यक असते. महिलांमध्ये हार्मोनल बदल मुरुमांचे कारण असू शकते.

2. तणाव (Stress) –
जर एखादी व्यक्ती तणावाखाली असेल तर त्याचा ताण त्याच्या त्वचेवर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिसू लागतो. मुरुमे देखील त्याच तणावाचा एक प्रकार असू शकतात. डॉ. आंचल पंथ म्हणतात, कोणत्याही प्रकारच्या तणावामुळे मुरुम किंवा त्वचेची इतर समस्या उद्भवू शकते.

 

3. जास्त उन –
मुरुमे टाळण्यासाठी, सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून त्वचेचे संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे. सूर्यप्रकाशाच्या जास्त संपर्कामुळे मुरुमांची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे उन्हात बाहेर जाण्यापूर्वी चेहर्‍याला सनस्क्रीन नक्कीच लावा.

 

4. लठ्ठपणा आणि उच्च कोलेस्ट्रॉल (Obesity and High Cholesterol)
आहाराचा त्वचेच्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम होतो.
डॉ पंथ यांच्या मते, उच्च कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणा याचा 30 ते 40 वयोगटातील प्रौढांमध्ये मुरुमांशी संबंध आहे.

 

5. साखर आणि दुधाचे अतिसेवन (Excess Intake of Sugar and Milk)
डॉ पंथ सांगतात की, जर मुरुमांच्या समस्येचा सामना करावा लागत असेल
तर साखर आणि दुधाचे सेवन कमी करा किंवा ते टाळा.
अतिरिक्त साखर आणि दूध शरीरात इन्सुलिन सारखी ग्रोथ फॅक्टर वाढवतात.
खॠऋ तेल-उत्पादक ग्रंथींना अधिक तेल तयार करण्यासाठी उत्तेजित करते आणि यामुळे मुरुमांची गंभीर समस्या उद्भवू शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Facing Acne Problem | facing acne problem in women men know its reason and precaution from expert

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | दारु पिण्यास मनाई केल्याने जीवे मारण्याची धमकी; कोथरुडमधील घटना

Winter Diet Chart | हिवाळ्यात कसा असावा डाएट चार्ट, जाणून घ्या सविस्तर

Pune Crime | पुणे : 5 लाखाची खंडणी मागणाऱ्या पोलिस कर्मचार्‍यावर खंडणीचा FIR