Fact Check | अलर्ट ! नोकरी देण्याच्या बहाण्याने थेट मोदी सरकारच्या नावे होतेय फसवणूक; काळजी घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Fact Check । कोरोनाच्या (Corona virus) दुसऱ्या लाटेत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांचा व्यवसाय (Business) देखील बंद पडला. यामुळे अनेक सामान्य लोक या विषाणूमुळे हतबल झाले. याचबरोबर लॉकडाऊन (Lockdown) काळात अनेकांची फसवणूक (fraud) देखील झाली आहे. फसवणुकीचे प्रमाण वाढल्याने अनेकजण भूलथापांना बळी पडताना दिसत आहे. नोकरी देण्याच्या आमिषाने अनेकांना गंडा घातला जातोय. अशीच एक माहिती उघड (Fact Check) झाली आहे. अनेक फसवणूकदार अटल गुन्हेगार थेट पंतप्रधान मोदींच्या (Prime Minister Modi) नावे फसवणूक करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Fact Check | pib fact check fake website of pmrojgaaryojna asking money as registration fee do not fall into trap check details here

पीएम रोजगार योजनेची (PM Employment Scheme) बनावट वेबसाइट तयार करून त्याच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. यामुळे अनेक नागरिक या फसवणुकीच्या जाळ्यात अडकत आहेत. यामुळे लोकांनी अशा फेक वेबसाइटवर क्लिक करणे स्वीकारणे अथवा त्याठिकाणी नोकरीसाठी अर्ज करणं टाळा. केंद्र सरकारच्या (Central Government) प्रेस इन्फरमेशन ब्युरो या संस्थेच्या फॅक्ट चेक (PIB Fact Check) ने यासंदर्भात नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. या खोट्या वेबसाइट बाबत PIB फॅक्ट चेकने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

दरम्यान, https://pmrojgaaryojna.in या वेबसाइटच्या माध्यमातून विविध पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत आणि 100 रुपये नोंदणी शुल्क मागितले जात आहे. तसेच, ही वेबसाइट (Website) आणि हे नोटिफिकेशन फेक आहे. नागरिकांना अशा कोणत्याही वेबसाइटवर विश्वास न ठेवण्याची विनंती पीआयबीने (PIB) केली आहे. याबाबत पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

असं करा फॅक्टचेक –

कोणत्याही सरकारी योजना (Government scheme) अथवा धोरणांबाबतच्या सत्यतेबाबत
संशय असल्यास, लोकांनी PIB फॅक्ट चेककडे ते पाठवू शकता. तर वेगवेगळ्या सोशल मीडिया
प्लॅटफॉर्म तसेच, मेलद्वारे देखील PIB फॅक्ट चेकशी संपर्क करू शकणार आहे. WhatsApp वर
8799711259 या नंबरवर संपर्क करता येणार आहे. याव्यतिरिक्त Twitter @PIBFactCheck,
Facebook वर PIBFactCheck आणि [email protected] ईमेलच्या माध्यमातून
देखील संपर्क करू शकणार आहे.

हे देखील वाचा

Gold Price Today | सोने 47 हजार रुपयांच्या पुढे, तात्काळ करा खरेदी; लवकरच आणखी वाढतील दर

इंटरनेटचा स्पीड कमी असेल तरी विना अडथळा असे पहा YouTube Video, अतिशय सिंपल आहे ‘ही’ Trick

Amazon India | पैसे कमावण्याची सुवर्णसंधी ! Amazon India देतंय चार तासात 60,000 रुपये महिना, जाणून घ्या काय करावे लागेल

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Fact Check | pib fact check fake website of pmrojgaaryojna asking money as registration fee do not fall into trap check details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update