उस्मानाबाद : परांडा पेट्रोल पंप लुटल्याच्या बनावाचा ‘पर्दाफाश’

उस्मानाबाद (परांडा) : पोलीसनामा ऑनलाईन – अजिंक्यराजे पेट्रोलियम डोंमगाव ता. परांडा येथे दि. 09.09.2019 रोजी रात्री 02.30 वा तीन अनोळखी पुरूष आरोपींनी पेट्रोलपंप कामगार श्रीराम महादेव खरात,  प्रशांत नरसाळे, रमेश खताळ (सुरक्षारक्षक) रा. डोंम गाव ता. परांडा या तिघांच्या डोळ्यात मिरची पुड टाकुन व त्यांना कोयत्याने मारहाण करुन पेट्रोल पंपावरील रोख रक्कम रू 192570/-  व नमुद तिन्ही कामगाराचे तिन मोबाईल फोन एकुण किमत रू 5100/- असा एकूण रू 197670/- चा माल जबरदस्तीने चोरून नेला आहे अशी तक्रार पेट्रोल पंप कामगार श्रीराम महादेव खरात रा. डोंमगाव ता. परांडा याने पोलीस ठाणे परांडा येथे 09.09.2019रोजी नोंदविली होती.

परांडा पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन सदर प्रकारची चौकशी केली. तपास दरम्यान पेट्रोल पंप मॅनेजर अजित हावलदार गायकवाड रा. डोंबगाव ता. परंडा यांच्या व त्यांच्या सहकारी पेट्रोल पंप कामगार श्रीराम महादेव खरात यांच्या वर्तनात व जबाबात विसंगती आढळून आल्याने पोलिसांनी त्यांचावरील संशय बळावला. यावरून त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

तपासा दरम्यान राहुल हावलदार गायकवाड पेट्रोल पंप मॅनेजर, श्रीराम महादेव खरात पेट्रोल पंप कामगार, राहुल प्रभाकर दाभाडे, अजित भाऊराव धेंडे सर्व आरोपी रा. डोंमगाव,  ता. परांडा आणि अनिल देविदास कांबळे रा. हडपसर, पुणे या सर्वांनी मिळून हा पेट्रोल पंप लुटीचा बनाव रचल्याचे उघड झाले असुन या पाचही आरोपींना एपीआय राठोड यांनी अटक केली आहे व पुढील तपास एपीआय राठोड करीत आहे.