Falguni Nayar | नोकरी सोडून 50 व्या वर्षी सुरू केला कॉस्मेटिकचा बिझनेस, 9 वर्षात बनल्या अरबपती; एका तिमाहीत विकली 20 कोटी डॉलरची उत्पादने

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फाल्गुनी नायर (Falguni Nayar) यांनी सर्व समज खोटे ठरवत यशाची नवीन पटकथा लिहिली आहे. ज्या वयात लोक निवृत्तीचे प्लानिंग करतात त्या वयात फाल्गुनी नायर (Falguni Nayar) यांनी आपली बँकेतील चांगली नोकरी सोडून कॉस्मेटिकचा बिझनेस (cosmetic business) सुरू केला आणि अवघ्या 9 वर्षातच त्या खरबपती बनल्या.

 

फाल्गुनी नायर (Falguni Nayar), ब्यूटी आणि वेलनेस कंपनी Nykaa च्या फाऊंडर आहेत. त्यांच्या ब्युटी प्रॉडक्टची रेंज महिलांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली, ज्यामुळे अवघ्या एका तिमाहीत त्यांच्या कंपनीने 20 कोटी डॉलरची उत्पादने विकली. सुमारे एक आठवड्यापूर्वी Nykaa च्या IPO ला मंजूरी मिळाली आहे, ज्यानंतर आता त्यांची ओळख अरबपती बिझनेसवुमन म्हणून होऊ लागली आहे.

 

कोण आहेत फाल्गुनी नायर :
फाल्गुनी नायर (Falguni Nayar) यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1963 ला झाला होता, नायर यांच्या करियरची सुरुवात एएफ फर्ग्युसन कंपनीमध्ये मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून झाली, यानंतर 1993 मध्ये त्या कोटक महिंद्रा ग्रुपसोबत जोडल्या गेल्या आणि 19 वर्ष काम केले.

 

2005 मध्ये त्या मॅनेजिंग डायरेक्टर बनल्या आणि 2012 पर्यंत या पदावर होत्या. नोकरी दरम्यान त्यांनी खखच अहदाबादमधून एमबीए केले आणि येथूनच त्यांना बिझनेसची कल्पना सुचली. फाल्गुनी केकेआर इंडियाचे प्रमुख संजय नायर यांच्या पत्नी आहेत.

 

फाल्गुनी नायर यांनी 2012 मध्ये नायका कंपनीची स्थापना केली. येथे सौंदर्य प्रसाधने म्हणजे ब्यूटी प्रॉडक्टची नवीन रेंज आणण्यात आली. 2012 मध्ये हा अगदी वेगळा विचार होता, फ्लिपकार्ट आणि अमेझॉनसारख्या ब्रँडने आपली ओळख निर्माण केली होती. परंतु ब्यूटीसंबंधी डेडिकेटेड मोबाइल अ‍ॅप किंवा वेबसाइट आली नव्हती.

येथे प्रॉडक्टची नवीन रेंज सादर केली असता लोकांनी मोठा प्रतिसाद दिला.
यानंतर फॅशनचे विविध प्रॉडक्ट सुद्धा सादर करण्यात आले. कंपनीचा दावा आहे की,
त्यांच्याकडे पन्नास लाखापेक्षा जास्त अ‍ॅक्टिव्ह यूजर्स आहेत, सोबतच 70 स्टोअर आणि 1500 पेक्षा जास्त ब्रँड आहेत.
कंपनीकडे सुमारे 1 लाख 30 हजार प्रॉडक्ट उपलब्ध आहेत.
2018 मध्ये नायकाने महिलांच्या वेगळ्या वेबसाइटने मेल ग्रूमिंगकडे सुद्धा लक्ष दिले.

 

महामारीमध्ये जवळपास सर्वच बिझनेस मॉडल नुकसान सहन करत असताना नायका प्रॉफिट जमा करत होती.
आर्थिक वर्ष 2019-2020 मध्ये कंपनीचे प्रॉफिट 159.32 कोटीच्या जवळपास होते, हा आकडा यासाठी महत्वाचा आहे
कारण यामुळे एक वर्षापूर्वी नायकाला 17.7 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.

 

एका रिपोर्टनुसार, नायकाने 2020 मध्ये 100 मिलियन डॉलरपेक्षा जास्त फंड जमा केला होता.
ज्यानंतर त्याची मार्केट व्हॅल्यू एक बिलियनच्या पुढे गेली.

 

फाल्गुनी नायर यांना नायकाची आयडिया मल्टी-ब्रँड ब्यूटी प्रोडक्ट स्टोअर्सला भेट दिली असता आली.
त्यांचे म्हणणे होते की, असे एकही स्टोअर नव्हते जिथे सर्वकाही मिळू शकते, म्हणून त्यांनी असेच स्टोअर बनवले.

 

Web Title :- Falguni Nayar | falguni nayar nykaa founder success story billionaire business women

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kranti Redkar | वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांचा नवाब मलिकांवर पलटवार, म्हणाल्या – आरोप चोमडेपणासारखे, किचन पॉलिटिक्समधून बाहेर या

Life Certificate | नियमीत पेन्शन मिळण्यासाठी ‘या’ तारखेपूर्वी जमा करा लाईफ सर्टिफिकेट, जाणून घ्या काय आहे प्रोसेस?

Bank Holidays November 2021 | नोव्हेंबरमध्ये पूर्ण 17 दिवस बंद राहणार बँका! कामासाठी जाण्यापूर्वी पहा सुट्ट्यांची यादी