डॉक्टरने टाकली बोर्डवर खोटी पदवी

अहमदनगरः पोलिसनामा ऑनलाईन- संगमनेरमधील एका महिला डॉकटरकडे ‘बीएचएमएस’ची पदवी असताना तिने आपल्या हॉस्पिटच्या दर्शनी भागातील बोर्डवर प्रसुती आणि स्त्री रोगतज्ज्ञ (डीजीओ) अशी पदवी टाकून  महिला रुग्णांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात डॉ. श्रद्धा वाणी हिच्याविरुद्ध आज सायंकाळी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, संगमनेर शहरातील लिंक रस्त्यावर वाणी यांचे हॉस्पिटल आहे. तेथील डॉ. श्रद्धा वाणी या  स्रियांची पदवी नसतानाही स्त्रीयांच्या जिवाशी खेळत असल्याची तक्रार संगमनेर नगरपलिकेतील बोगस डॉकटर शोध समिती पथकाचे प्रमुख डॉ. विकास पाचोरे यांच्याकडे केली होती.

त्या तक्रारीवरून डॉ. पाचोरे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथक वाणी हॉस्पिटलमध्ये गेले. तेथे डॉ. श्रद्धा वाणी हिच्या डिग्रीबाबत तपासणी केली असता त्यांच्याकडे फक्त ‘बीएचएमएस’ची पदवी असल्याचे आढळून आले.  तिच्याकडे आयुर्वेद प्रॅक्टीस करणे आवश्यक असताना तिच्याकडे अ‍ॅलिओपॅथीची प्रॅक्टीस करीत असल्याचे पुरावे आढळून आले. तसेच तिच्याकडे ‘डीजीओ’ची पदवी आढळून आली नाही.

याबाबत बोगस डॉकटर शोध समिती पथकाचे प्रमुख डॉ. विकास पाचोरे यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून  डॉ. श्रद्धा वाणी हिच्याविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक कायद्याचा भंग करणे, बोर्डवर लिहिलेली ‘डीजीओ’ पदवी  खोडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आर. एम. सानप हे करीत आहे