Family Pension | मोदी सरकारने दिला मोठा दिलासा ! पेन्शनरच्या मृत्यूनंतर आता कुटुंबाला पेन्शन मिळवण्यास येणार नाही अडचण, बँकांना दिले ‘हे’ निर्देश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama online) – मोदी सरकारनं (modi government) पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर फॅमिली पेन्शनबाबत (Family Pension) निर्माण होणार्या अडचणी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नियम सोपे बनवण्यात आले आहेत. आता कुटुंबातील सदस्य पेन्शनरच्या मृत्यूनंतर निवडक कागदपत्रे जमा करून सहजपणे मासिक पेन्शन (Monthly Pension) घेऊ शकतात. फॅमिली पेन्शन (Family Pension) प्रकरणांचा लवकर निपटारा करण्यासाठी मोदी सरकारनं (modi government) पेन्शन वितरण करणार्या बँकांना आदेशही दिले आहेत. family pension disbursing will be smoother by banks indian govt ease the rule
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
जॉईंट खाते असल्यास या कागदपत्रांची आवश्यकता
जर पती किंवा पत्नीचे जॉईंट अकाऊंट आहे (Joint Account) आणि पेन्शनधारकाचा (Pensioner) मृत्यू झाला तर एक साधारण अर्ज, मृत्यूचे प्रमाणपत्र, पेन्शनधारकाला (Pensioner) जारी पीपीओची प्रत, जर उपलब्ध असेल, अर्जदाराच्या वय/जन्म तारखेच्या दाखल्याची कॉपी द्यावी लागेल. हे व्हेरिफाय झाल्यानंतर पेन्शन मिळू लागेल.
सिंगल अकाऊंट असल्यास काय करावे
पती किंवा पत्नीचे मृत पेन्शनधारकासोबत (Pensioner) संयुक्त खाते नसेल तर त्यांना कौटुंबिक पेन्शन (Family Pension) मिळवण्यासाठी दोन साक्षीदारांच्या सहीचा फॉर्म 14 मध्ये अर्ज, पेन्शनधारकाच्या मृत्यूचा दाखला, पेन्शनधारकाला (Pensioner)जारी पीपीओ कॉपी, अर्जदाराचा वय/जन्म तारखेचा दाखला द्यावा लागेल. हे सर्व कागदपत्र सेल्फ अटेस्ट करावेत.
–
कुटुंबातील दुसर्या सदस्यांनी कशी घ्यावी पेन्शन
पेन्शनधारक (Pensioner)आणि पती किंवा पत्नीचा मृत्यू झाल्यास, कौटुंबिक पेन्शन (Family Pension)कुटुंबातील अन्य सदस्याला द्यावी लागते. अशा वेळी जर कुटुंबातील अन्य सदस्यांना पीपीओमध्ये कौटुंबिक पेन्शनसाठी सोबत नॉमिनी बनवले गेले आहे तर वरील प्रमाणेच प्रक्रियेचे पालन केले जाईल. पण जर कुटुंबातील इतर सदस्याच्या नावाचा पीपीओमध्ये समावेश नसेल तर त्यांना नवीन पीपीओ जारी करण्यासाठी त्या कार्यालयाशी संपर्क करावा लागेल, जिथे सरकारी कर्मचारी/पेन्शनरने शेवटी सेवा केली होती.
Web Titel :- Family Pension | family pension disbursing will be smoother by banks indian govt ease the rule
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
…म्हणून प्रताप सरनाईक एवढे हतबल झाले; खा. संजय राऊत यांनी सांगितले
पहिल्यांदाच शनिवार, रविवारी लागोपाठ पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर