Family Pension Rules | सरकारी नोकरदारांसाठी मोठा दिलासा ! कर्मचारी ‘बेपत्ता’ झाल्यानंतर कुटुंबाला लगेच मिळणार पेन्शन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Family Pension Rules | सरकारी नोकरदारांसाठी (Government Servant) मोठी माहिती समोर आली आहे. बेपत्ता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कौटुंबिक निवृत्ती वेतन नियम (Family Pension Rules) शिथिल करण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीर आणि ईशान्येकडील त्याचबरोबर माओवाद ग्रस्त प्रदेश यांसारख्या दहशतवाद ग्रस्त भागात सेवा करणाऱ्यांच्या कुटुंबांसाठी मोदी सरकारकडून (Modi Government) एक मोठा दिलासा देण्यात आला आहे. याबाबत माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Union Minister Jitendra Singh) यांनी दिली.

 

कार्मिक मंत्रालयाने (Department of Personnel & Training ) जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये National Pension System (NPS) समाविष्ट असलेले सरकारी कर्मचारी सेवेदरम्यान बेपत्ता झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतनाचे फायदे त्वरित दिले जातील. आणि जर तो पुन्हा हजर झाला आणि पुन्हा सेवे रुजू झाल्यास कौटुंबिक निवृत्तीवेतन त्याच्या गहाळ कालावधीच्या दरम्यानच्या देण्यात आलेली रक्कम त्याच्या पगारातून त्यानुसार कापली जाऊ शकते. याआधी, बेपत्ता सरकारी कर्मचाऱ्याला कायद्यानुसार मृत घोषित करेपर्यंत अथवा तो बेपत्ता होऊन 7 वर्षे पूर्ण होईपर्यंत कुटुंब निवृत्ती वेतन दिले जात नव्हते. (Family Pension Rules)

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या माहितीनूसार, ”विशेषत: ज्या प्रदेशात सरकारी कर्मचारी बेपत्ता झाल्याची घटना सतत नोंदवली जातेय.
हिंसाचारग्रस्त भागात काम करणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या अपहरणाची प्रकरणे समोर आली आहेत आणि त्यामुळे आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या व त्यांच्या कौटुंबिक हिताचे रक्षण करण्यासाठी पेन्शन नियमांमध्ये बदल करण्यात आलेय.”

 

दरम्यान, सीसीएस (पेन्शन) नियम, 1972 अंतर्गत येणारा एखादा सरकारी कर्मचारी बेपत्ता झाल्यास,
बेपत्ता कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना 25 तारखेला थकबाकी वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन, सेवानिवृत्ती उपदान,
रजा रोख रक्कम इत्यादींचा लाभ जून 2013 रोजी जारी निर्देशानुसार मिळणार असल्याचं मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं.

 

Web Title :- Family Pension Rules | big relief for central govt employee new rules for payment of family pension if employee goes missing modi government department of personnel and training

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा