PM Kisan योजनेचे 2 हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झाले का ? जाणून घ्या ‘ही’ सोपी प्रक्रिया
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) देशातील शेतकऱ्यांसाठी (Farmer) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) राबवत आहे. याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना होतो. पीएम किसान योजने अंतर्गत काही ठराविक महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा केले जातात. तुम्हीही या योजनेंतर्गत नोंदणी केली असल्यास तुमच्याही बँक खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan) शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात. ही रक्कम 2000-2000 रुपयांच्या हप्त्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. देशातील पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होत आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी ही योजना केंद्र सरकारकडून (Central Government) राबवली जात आहे. दरम्यान या योजनेची रक्कम बँक खात्यात जमा होतेय का नाही ? याबाबत सोप्या प्रक्रियेनुसार जाणून घ्या.
जाणून घ्या प्रक्रिया –
– प्रथम अधिकृत पोर्टल https://fw.pmkisan.gov.in/BeneficiaryStatus/BeneficiaryStatus.aspx वर जा.
– वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला समोर एक स्क्रीन दिसेल.
– तुम्हाला येथे महत्त्वाची माहिती द्यावी लागेल.
– तुम्हाला स्क्रीनवर आधार नंबर, मोबाइल नंबर आणि बँक अकाउंट नंबर दिसेल.
– त्यानंतर तुम्हाला आधार, मोबाइल आणि अकाउंट नंबरपैकी एक पर्याय निवडायचा आहे.
– या प्रोसेसनंतर तुमच्या समोर सर्व माहिती येईल.
– यावरून बँक खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची रक्कम जमा होत आहे की नाही. हे तुमच्या लक्षात येईल.
Web Title :- PM Kisan | pm kisan yojana how to check of installment money in your bank account
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update