अभिनेता किरण कुमार ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, मागील 10 दिवसांपासून ‘क्वारंटाईन’, स्वत: दिली माहिती

मुंबई : संपूर्ण जग सध्या कोरोनाशी लढत आहे, सर्व प्रयत्न करूनही हा प्रकोप थांबण्याचे नाव घेत नाही, भारतात सुद्धा कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. येथे संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या वाढून 125101 झाली आहे. जगात सर्वात जास्त नवीन प्रकरणे समोर येणार्‍या देशात अमेरिका, रशिया आणि ब्राझीलनंतर भारताचा नंबर आहे, भारतात सर्वात जास्त कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आहेत.

वृत्त हे आहे की, बॉलीवुडचे प्रसिद्ध अभिनेते किरण कुमार यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे, ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, याबाबत किरण कुमार यांनी मीडियाला माहिती दिली की, 14 मे रोजी त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती, यानंतर आपल्या घरात ते क्वारंटाईन आहेत. त्यांची पुढील कोविड-19 टेस्ट 25 मे रोजी होणार आहे.

किरण कुमार म्हणाले, त्यांच्या घराचे दोन फ्लोर आहेत, त्यांची पत्नी आणि मुले पहिल्या मजल्यावर राहतात आणि त्यांनी स्वताला वरील फ्लोरवर आयसोलेट केले आहे. कुटुंबासोबत ते फोनवर बोलतात. ते म्हणाले वेळ कठीण आहे, परंतु सर्वांनी सध्या सकारात्मक राहिले पाहिजे. त्यांना खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होत होता. बोलण्यास, चालण्यास त्रास होत होता. त्यांनी आपली एक टेस्ट केली असता कोरोना झाल्याचे समजले.

हिंदी चित्रपटातील दिग्गज कलाकार दिवंगत जीवन कुमार यांचे पूत्र किरण कुमार यांनी आपल्या करियरमध्ये प्रथम ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ’दो बूंद पानी’ मध्ये भूमिका केली होती, पण त्यांना खरी ओळख मिळाली खलनायक मधील भूमिकेतून, ’खुदगर्ज’, ’तेजाब’ आणि ’खुदा गवाह’ सारख्या चित्रपटांनी त्यांच्या करियरला नवी उंची दिली. किरण यांनी मराठी, हिंदी, गुजराती आणि भोजपुरी चित्रपटातून नायकाची भूमिका केली आहे. सध्या ते टीव्हीवर देखील सक्रिय आहेत. धडकन आणि मुझसे दोस्ती करोगे सारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत.

किरण कुमार यांच्या अगोदर गायिका कनिका कपूर, जोया मोरानी, तिची बहिण शाजा मोरानी आणि तिचे वडील करीम मोरानी यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेता पूरब कोहलीला सुद्धा संसर्ग झाला आहे. मात्र, या कलाकारांची प्रकृती सध्या ठिक आहे. याशिवाय अनेक फिल्मी आणि टीव्ही कलाकार असे आहेत, ज्यांच्या घरी काम करणार्‍या लोकांना कोरोना झाल्याचे आढळले आहे.