पराभवामुळे नव्हे तर ‘या’ कारणामुळे पाकिस्तानचा कॅप्टन सरफराज सोशल मीडियावर होतोय ‘ट्रोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काल विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान सामना चांगलाच रंगला. सर्वांचे लक्ष सामन्यावर होते. सामन्याचे दडपण सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होते. अखेर भारताने पाकिस्तानवर नेहमीप्रमाणे विजय मिळवलाच. त्यानंतर भारतीय संघाची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. त्यातच आणखी एक व्यक्ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. तो म्हणजे खुद्द पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद.

सामना सुरु असताना सर्वांच्या चेहऱ्यावर दडपण असते. त्यात भारत-पाकिस्तान सामना असल्यावर खेडाळूच काय पण चाहत्यांनाही आळस येणार नाही. किंवा झोप येणार नाही. पण पाकिस्तानचा कर्णधार मैदानावर चक्क जांभया देताना दिसला. लोकांनी ते प्रत्यक्ष पाहिले की नाही माहित नाही, पण कॅमेऱ्याच्या नजरेतून हे सुटले नाही. त्यामुळे सरफराजचे जांभया देतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसंच पाकिस्तानवर तोंडसुख घेण्यासाठी भारतीयांना कारणच मिळालं आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांनी सरफराजवर टीका टीपण्णी करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

जिंकण्याची कोणती आशाच नाही. कधी संपणार हा सामना म्हणजे हॉटेलवर जाऊन मसाज करता येईल, झोपणारा मॉनिटर असे अनेक कमेंट्स भारतीय चाहत्यांनी त्याच्या जांभया देण्याच्या फोटोवर दिल्या आहेत. तर अनेकांनी त्याला अनप्रोफेशनलही म्हटलं आहे. ही खिलाडू वृत्ती नाही, असंही अनेकांनी म्हटलं आहे. तर त्याच्या या फोटोंवर पाकिस्तानी चाहतेही भडकले आहेत.

दरम्यान, या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने क्षेत्ररक्षणाची निवड करत भारताला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. त्यावर भारतीय फलंदाजांनीही मोठ्या प्रमाणात फटकेबाजी करत ३३७ धावांचे आव्हान दिले होते. मात्र ते पाकिस्तानचे फलंदाज भारतीय गोलंदाजांपुढे टीकले नाही. आणि त्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सामना पुन्हा सुरु झाल्यावर पाकिस्तानला ४० षटकात ३०२ धावांचे आव्हान दिले. पावसापुर्वी त्यांचे ३५ षटक झाले होते. त्यामुळे त्यांना ५ षटकात १३६ धावांचे लक्ष देण्यात आले होते. मात्र हे पूर्ण करण्यात पाकिसतान सपशेल अपयशी ठरला आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –

केळीच्या सालीचे उपाय चकित करणारे, जाणून घ्या फायदे

सुंदर दिसण्यासाठी ‘हे’ ७ पदार्थ चेहऱ्यावर चुकूनही लावू नका

अर्थरायटिसला दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

अपचनाच्या समस्येसाठी ‘वज्रासन’ फायद्याचे