माझ्या 2 मुलांना तुमच्या मुलांप्रमाणे सांभाळा म्हणत शेतकर्‍याची आत्महत्या, बीड जिल्हयातील घटना

बीड : पोलीसनामा ऑनलाइन –   माझ्या दोन मुलांना तुमच्या मुलाप्रमाणे सांभाळा अशी चिठ्ठी लिहून एका शेतकऱ्याने (Farmer Commits Suicide) शासकीय योजनेतील पैसे न मिळाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बीड (Beed) जिल्ह्यातील राक्षस भुवन (Rakshas bhuvan) येते घडली आहे. बाळासाहेब ज्ञानोबा मस्के (वय-42) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

बाळासाहेब मस्के यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीमध्ये त्यांनी, मायबाप सरकार मी आत्महत्या करीत आहे. शासकीय योजनेतील पैसे मिळाले नसल्याने कर्जबाजारी झालो. मी एक शेतकरी असून शेती परवडत नाही म्हणून मी माझी जिवनयात्रा संपवत आहे. तसेच प्रिय बंधू नाना व आप्पा माझी दोन मुलं आहेत. त्यांना तुमच्या मुलाप्रमाणे सांभाळा, मी जात आहे मला माफ करा, असं चिठ्ठित लिहून मस्के यांनी आत्महत्या केली.

पोखरा योजना अंतर्गत घेतलेल्या लाभाचे पैसे आठ महिने झाले मिळाले नाहीत. शासकीय योजनेतील शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी पैसे मिळाले नाहीत. गोड्या पाण्यातील मत्स पालन केले त्याचे देखील अनुदान मिळाले नाही. यासाठी कर्ज काढलं. मात्र सरकारी निधी मिळाला नाही. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत आहे, असं या शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते आहे.