विहिरीतील पाणी काढताना तोल जावून शेतकऱ्याचा मृत्यू

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – तालुक्यातील रेणापूर शिवारातील एका शेतामध्ये विहिरीतील पाणी काढताना तोल जावून  विहीरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना 18 मे रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली.

रंगनाथ एकनाथ गव्हाणे (वय 55) राहणार शिंदे गल्ली, पाथरी असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

रंगनाथ गव्हाणे यांचे रेणापूर शिवारात शेत आहे. 18 मे रोजी ते शेतात काम करण्यासाठी गेले होते, सायंकाळच्या सुमारास तहान लागल्याने शेता शेजारच्या शेतातील विहीरीतून पाणी काढताना त्यांचा तोल गेल्याने ते विहीरीत पडले. डोक्याला गंभीर मार लागल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

परीसरात काम करणाऱ्या मजुरांनी तात्काळ गव्हाणे यांना बाहेर काढले परंतु त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी राजकुमार शेषराव शिंदे यांनी दिलेल्या माहितीवरून पाथरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पुढील तपास जमादार बर्गे हे करीत आहेत.

Loading...
You might also like