‘रिहाना’च्या ट्विटनंतर इंटरनॅशनल फोरमवर शेतकऱ्यांचा मुद्दा चर्चेत ! समर्थनार्थ उतरले ग्लोबल सेलिब्रिटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या वेशीवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्रानं आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात हे आंदोलन सुरू आहे. पंजाबी सिंगर आणि अभिनेत्यांनीही याला पाठींबा दिला आहे. हॉलिवूड सिंगर, पॉप स्टार, ॲक्ट्रेस रिहाना (Rihanna) हिनंही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. यानंतर आता इंटरनॅशनल सेलेब्सही या आंदोलनावर मत व्यक्त करताना दिसत आहेत.

पर्यावरणासाठी काम करणारी भारतीय ॲक्टीविस्ट लिसिप्रिया कंगुजम हिनंही ट्विट करत शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला आहे. त्यांनी ट्विट करत जगाला या आंदोलनाचं समर्थन करण्यास सांगितलं आहे. लिसिप्रिया तेव्हा चर्चेत आली होती जेव्हा तिनं पीएम नरेंद्र मोदी यांच्याकडून दिला जाणारा सन्मान नाकारला होता.

रिहानानंतर ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) नं देखील शेतकरी आंदोलनाबद्दल ट्विट केलं. भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आमचा एकजुटीनं पाठींबा आहे. ग्रेटां यापूर्वी भारतात NEET च्या परीक्षेला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांना समर्थन दिलं होतं.

रिहानानंतर आंतरराष्ट्रीय संस्था ह्युमन राईट वाच, इंटरनॅशनल इंटरनेट राईट्सची संबंधित संस्था, अमेरिकन मॉडेल अमांडा सेर्नी सहित अनेक मोठ्या संस्था आणि सेलेब्सनंही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे.