शेतकरी आंदोलनावर राकेश टिकैत यांची मोठी घोषणा; म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांकडून कृषी कायद्याला विरोध केला जात आहे. त्यासाठी आंदोलनही सुरु आहे. शेतकऱ्यांचे हे आंदोलन काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसताना आता त्याचबाबत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोठं विधान केले आहे.

शेतकरी आंदोलनावर बोलताना टिकैत म्हणाले, शेतकरी आंदोलन येत्या ऑक्टोबर महिन्याच्या आधी संपणार नाही. आमची घोषणा ‘कानून वापसी नहीं, तो घर वापसी नहीं’, अशी आहे. शेतकऱ्यांचा विरोध हा राजकीय विरोध नाही. त्यामुळे आम्ही कोणत्याही राजकीय नेत्याला व्यासपीठावर स्थान किंवा माईक दिला नाही.

तसेच 2019 पर्यंत भाजपच्या नेतृत्वातील प्रमुख घटक पक्षापैकी एक असलेल्या शिवसेना त्या 19 विरोधी पक्षांपैकी एक आहे, ज्यांनी 29 जानेवारीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला होता आणि शेतकऱ्यांचे आंदोलनाला समर्थन दिले होते.

दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी दिल्ली-उत्तर प्रदेशच्या सीमेवर गाजीपूर येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली.

दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ आंदोलन सुरु

शिरोमणी अकाली दल, आम आदमी पक्ष, काँग्रेस, राष्ट्रीय लोक दल, समाजवादी पार्टीसह इतर पक्षातील नेत्यांनी गाजीपूरचा दौरा केला होता. सध्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ दिल्लीत शेतकऱ्यांकडून विरोध सुरु आहे.