शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच ; पुन्हा काढणारा लॉंग मार्च

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नी निराश असल्याने शेतकरी पुन्हा लाँग मार्च काढण्याच्या तयारीत आहेत. हा लॉंग मार्च नाशिक ते मुंबई काढण्यात येणार असून या मार्चचे आयोजन किसान सभेच्या वतीने करण्यात येणार आहे. २० फेब्रुवारी २०१९ रोजी नाशिक शहरातील मुंबई नाका येथून या लॉंग मार्चची सुरुवात होणार आहे. आठ दिवस पायी चालून हा मार्च २७ फेब्रुवारी रोजी मुंबई शहरात दाखल होणार आहे. मागील मोर्चा पेक्षा आगामी मोर्चा हा विराट आणि भव्य असणार आहे. महाराष्ट्राच्या २३ जिल्ह्यातून शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या मोर्चाला राज्यव्यापी स्वरूप येणार आहे.

मागच्या वर्षी किसान सभेच्या वतीने नाशिक ते मुंबई भव्य पायी मोर्चा काढण्यात आला होता. शेतकरी कर्जमुक्ती, दीडपट हमीभाव, कसत असलेल्या जमिनींची मालकी, बुलेट ट्रेनला विरोध, पाणी, शेतकरी पेन्शन आदी मागण्यासाठी शेतकऱ्यांनी लोकशाही पध्द्तीने सरकारकडे आपल्या मागण्या केल्या होत्या. ४० हजार शेतकऱ्यांनाचा एल्गार फोड आलेल्याने रक्त आणि पु वाहणाऱ्या पायाने मुंबईत येऊन थोपल्या नंतर राज्य सरकारला या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची इच्छा झाली. परंतु मागण्या मान्य होऊन हि अद्याप कोणत्याही पध्द्तीची अंमलबजावणी गेल्या एक वर्ष भराच्या कालावधीत करण्यात आली नसल्याने शेतकरी पुन्हा मार्च काढत आहेत.

भारत भरातील २०८ संघटनांनी एकत्र येत दिल्लीच्या संसद भवनावर असाच देशव्यापी मार्च काढण्यात आला होता. त्या मोर्चाच्या मागण्या आणि २० फेब्रुवारीला काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या मागण्या बऱ्याच प्रमाणावर सारख्याच आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्याकडे सरकार हव्या त्या प्रमाणात लक्ष देत नसल्याने वारंवर मोर्चे काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते आहे.केंद्र सरकारने संसदेवर आलेल्या मोर्चाला आश्वस्त करताना आगामी अर्थसंकल्पात आपल्या मागण्याला न्याय देणाऱ्या घोषणा केल्या जातील असे सांगण्यात आले होते. मात्र पियुष गोयल यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.

हेल्मेटला विरोध करणाऱ्यांना अटक करा ; ‘या’ मंत्र्याने दिले आदेश