हवामान आणि सणात या 10 घरगुती उपायांच्या मदतीने आपले सौदर्य ठेवा उजळलेले

पोलीसनामा ऑनलाइन – दिवाळीची तयारी करताना आपल्या त्वचेकडे लक्ष देऊ शकत नसाल तर जास्त काळजी करण्याचे कारण नाही. काही काही सोपे आणि नॅचरल उपाय घरातच करून काही दिवसात तुम्ही सौंदर्य उजळवू शकतात. हे घरगुती उपाय कोणते ते जाणून घेवूयात…

हे नैसर्गिक उपाय करा
1
दिवसात किमान 3-4 वेळा चेहरा ग्लिसरीनयुक्त साबणाने धुवा.

2 चेहरा साफ करण्यासाठी ओटचे पीठ दुधात किंवा दह्यात मिसळून दहा मिनिटे चेहर्‍यावर लावा आणि दहा मिनिटानंतर कोमट पाण्याने धुवून काढा.

3 कोरड्या हळदीचा तुकडा वाटून त्यामध्ये लिंबू रस मिसळून लावल्याने चेहर्‍यावरील डाग दूर होतात.

4 कोरड्या त्वचेवरील डाग घालवण्यासाठी दुधात चंदन उगाळून लावा.

5 मधात हळद आणि लिंबू रस मिसळून तयार केलेला फेसपॅक लावा, त्वचा उजळते.

6 टोमॅटोमध्ये दहा-बारा थेंब लिंबू रस टाका हे मिश्रण लावल्याने चेहर्‍यावरल डाग दूर होतात.

7 त्वचा फ्रेश होण्यासाठी स्पा सुद्धा करू शकता.

8 हंगामी फळांचा लाभ घ्या. संत्र्यात चांगले सौम्य ब्लीचिंग एजेंट असतात आणि स्ट्रॉबेरी फेसपॅक तेलकट त्वचेसाठी चांगला असतो.

9 जास्त चहा, कॉफी, दारू इत्यादी सेवन करू नका. व्हिटॅमिन सी साठी लिंबूचे सेवन करा.

10 सौंदर्य कायम राखण्यासाठी सनस्क्रीन लावण्यास विसरू नका.