Fatty Liver | फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी चुकूनही खाऊ नयेत हे 5 फूड्स, अन्यथा वाढू शकते ही समस्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Fatty Liver | लिव्हर (Liver) हा आपल्या शरीराचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. शरीरासाठी प्रथिने तयार करणे, विषारी पदार्थ बाहेर टाकणे, अन्न पचवणे, ऊर्जा साठवणे, पित्त तयार करणे आणि कार्बोहायड्रेट साठवणे हे काम फक्त लिव्हर करते. त्याची योग्य काळजी घेतली नाही तर अनेक आजार होऊ शकतात. (Fatty Liver)

 

अयोग्य आहार, लठ्ठपणा, शारीरिक हालचालींचा अभाव आणि बिघडलेली जीवनशैली यामुळे फॅटी लिव्हर (Fatty Liver) च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. फॅटी लिव्हर रोग एक मेटाबॉलिक सिंड्रोम आहे जो एक गंभीर लिव्हर डिसिज आहे. लिव्हरमध्ये चरबी जास्त झाल्याने जळजळ वाढते, अवयवांचे नुकसान होण्याचा धोकाही वाढतो.

 

फॅटी लिव्हरची समस्या असेल तर आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. फॅटी लिव्हरच्या समस्येला वैद्यकीय भाषेत हेपॅटिक स्टीटोसिस म्हणतात.

फॅटी लिव्हरची ही आहेत लक्षणे (symptoms of fatty liver)
1. पोटाच्या उजव्या बाजूला वेदना
2. नेहमी थकवा जाणवतो
3. भूक न लागणे
4. मळमळ

 

काय खाऊ नये :
जास्त तेलकट-मसालेदार पदार्थ, तूप, लोणी, मलईयुक्त दूध, कॅन केलेला फळांचा रस, कँडी, आईस्क्रीम, मिठाई, जास्त प्रमाणात मद्य सेवन या गोष्टी टाळाव्यात.

 

काय खावे :
आहारात कमी कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश करा, फायबर, प्रोटीन, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड युक्त सालमन मासे, फ्लेक्स सीड्स, अक्रोड, लसूण, ब्रोकोली, कॉफी, ग्रीन टी, हिरव्या भाज्या.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :-  Fatty Liver | fatty liver patients should not eat these 5 foods otherwise the problem may increase you should know

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Garlic | तुम्हाला लसून खुपच आवडतो का? तर व्हा सावध! अति सेवन केल्याने लिव्हरचे होऊ शकते नुकसान

Pizza Burger | पिझ्झा-बर्गरची असेल आवड तर बिघडू शकते पचन, या 4 घरगुती उपायांनी ठिक करा पचनक्रिया

Uric Acid | वाढली असेल सांधेदुखी तर ‘या’ 5 पद्धतीने मिळवू शकता आराम, जाणून घ्या