Corona Virus : ‘त्या’ जहाजामुळं सिंधुदुर्गात भीतीचं वातावरण

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात दहशत पसरवली आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कोरोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. याचे कारण म्हणजे सिंधुदुर्गातील सावंतवाडीजवळील रेडी बंदरात एक चिनी जहाज दाखल झाल्याची माहिती पसरली आहे. यामुळे कोकणात एकच खळबळ उडाली आहे.

या जहाजावर असलेल्या कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला असल्याची शक्यता ग्रामस्थांना असल्याने सावंतवाडी परिसरात संशयाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे रेडी बंदरातील जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून कडून करण्यात आली आहे.

दरम्यान, एका खासगी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून या जहाजावरील कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आल्याचे समजते. ज्यात कोणत्याही कर्मचाऱ्याला लग्न झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र ही तपासणी अंतिम नाही. सक्षम आणि तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून ही तपासणी केली जावी अशी मागणी गावकऱ्यांनाही कावून धरली आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील लोकांच्या आरोग्याशी खेळू नये, अशा भावना स्थानिक व्यक्त करत आहेत.