महिला पोलिसाच्या मोबाइल नंबर पुढे लिहिलं ‘सेक्स वर्कर’; लोकं मध्यरात्री फोन करुन विचारू लागले रेट !; एकाला अटक

कर्नाटक : वृत्तसंस्था – कर्नाटक राज्यातील चिकमंगळुरूमध्ये 30 वर्षीय या शिक्षकाने एका महिला कॉन्स्टेबलचं नाव आणि तिचा मोबाइल क्रमांक कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या बसस्टँडच्या सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीवर लिहिला होता. त्यानंतर महिलेला मध्यरात्री अनेक फोन येऊ लागले. यामुळे महिला त्रस्त झाली. अखेर याचा अधिक तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणी सतीश नावाच्या एका शिक्षकाला अटक केली आहे. महिला कॉन्स्टेबल आणि सतीश एका टीचर ट्रेनिंगदरम्यान सहकारी असल्याचे समोर आले.

महिला कॉन्स्टेबलने पोलिसांना सांगितले की, जेव्हा रात्री-अपरात्री लोकांचे फोन येऊ लागले होते. त्यानंतर याबाबत खुलासा झाला. फोन करणारे लोक मध्यरात्री तिच्यासोबत सेक्स करण्याबाबत बोलत होते. तिला घरी बोलावण्याचं रेट विचारत होते. सुरुवातीच्या काही फोन कॉल्सकडे तिने लक्ष दिले नाही. जेव्हा अशा कॉल्सचं प्रमाण वाढू लागल्याने तिला शंका आली.

या महिला कॉन्स्टेबलने एका कॉलरला विचारलं की, तुला हा नंबर कुठून मिळाला? तेव्हा त्याने सांगितलं की, हा नंबर कडूर बसस्टँडच्या पुरुषांच्या सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीवर लिहिलेला होता. ती आपल्या पतीसोबत 15 डिसेंबर रोजी शौचालयात गेली. तेथे भिंतीवर महिला कॉन्स्टेबलचा मोबाइल क्रमांक लिहिला होता. मोबाइल नंबरसह तिथे सेक्स वर्कर म्हटले होते. कॉन्स्टेबलला हस्ताक्षरावरुन ओळख पटली आणि तिला भूतकाळात घडलेली एक गोष्ट आठवली. यानुसार हे कृत्य सतीश याने केल्याची शंका आली. सतीश तिच्यासोबत 2006-07 दरम्यान एका टीचर ट्रेनिंगदरम्यान सहकारी होता. 2017 मध्ये त्याच्या एका क्लासमेटने व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये सतीशहि होता. सतीश या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह संदेश पाठवित असे. याशिवाय तो महिला कॉन्स्टेबलला फोन करुनही त्रास देत होता.

या महिला कॉन्स्टेबलने सांगितले की, जेव्हा त्याने सतीशकडे दुर्लक्ष करणं सुरू केलं, तेव्हा तिला व्हॉट्सॲप ग्रुपवरुन हटवले. तिला कोणा दुसऱ्या सदस्याने पुन्हा ग्रुपमध्ये घेतले. सतीशने तिला पुन्हा हटवलं. काही महिन्यांपूर्वी तिने सतीशला फोन केला, ज्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. सतीशने सूड घेण्यासाठी आणि तिची बदनामी करण्यासाठी शौचालयाच्या आतील भिंतीवर तिचा नंबर सेक्स वर्कर आहे म्हणून लिहिला, असे तपासात समोर आले.