FIFA World Cup 2022 | मेस्सीने फायनलमध्ये रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फुटबॉलपटू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – FIFA World Cup 2022 | यंदाचा फिफा वर्ल्डकप कतारमध्ये पार पडला. या वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करत फिफा वर्ल्डकपवर आपले नाव कोरले आहे. या सामन्यात मेस्सीने फ्रान्सवर पहिला गोल करताच एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या सामन्यात मेस्सीने गोल्डन बॉल जिंकला आहे. यासह तो दोन वेळा गोल्डन बॉल जिंकणारा एकमेव फुटबॉलपटू ठरला आहे. (FIFA World Cup 2022)

तसेच मेस्सीने कतार वर्ल्ड कपमध्ये सहावा गोल केला आणि एका फिफा वर्ल्ड कपच्या एका एडिशनमध्ये ग्रुप स्टेज, राउंड ऑफ 16, क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनलमध्ये गोल करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. हा वर्ल्डकप त्याच्या कारकीर्दीतील 5 वा वर्ल्डकप होता. त्याने आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये 12 गोल केले आहेत. मेस्सी क्रोएशियाविरुद्ध सेमीफायनलमध्ये अर्जेंटिनाकडून वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू ठरला आहे.

फिफा वर्ल्ड कप 2022 मध्ये मेस्सीने 6 पैकी 4 गोल हे पेनल्टीवर केले आहेत.
यातील पहिला गोल लीग स्टेजमध्ये सौदी अरेबियाविरुद्ध केला होता.
त्यानंतर दुसरा गोल मेक्सिकोविरुद्ध केला होता. तर राउंड ऑफ 16 मध्ये तिसरा गोल ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर क्वार्टर फायनलमध्ये नेदरलँड, सेमीफायनलमध्ये क्रोएशियाविरुद्ध आणि फायनलमध्ये फ्रान्स विरुद्ध गोल करत मेस्सीने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Web Title :- FIFA World Cup 2022 | fifa world cup lionel messi scored goal and made record in final

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | मिंधे खोके सरकारविरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक; विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी

Santosh Juvekar | संतोष जुवेकरचा नव्या हिंदी चित्रपटाबद्दल मोठा खुलासा; म्हणाला…

SGB Scheme | RBI देणार स्वस्त सोने खरेदी करण्याची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या कितीमध्ये खरेदी करू शकता १ ग्राम

Amruta Deshmukh | विकास सावंत पाठोपाठ अमृता देशमुखचीही बिग बॉसच्या घरातून एक्झिट