महाराष्ट्रातील ‘या’ महिला खासदाराची निश्चीतपणे लागणार ‘मंत्री’पदी वर्णी ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांनंतर आता मोदी सरकारच्या अध्यक्षतेखाली नव्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेची लगबग सुरु आहे. नव्याने स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळात शिवसेनेला चार मंत्रिपदे आणि राज्यसभेच्या उपसभापती पदाची आस लागली असून लवकरच भाजपाकडे या पदांची मागणी करण्यात येणार असल्याचे समजते आहे. विशेष म्हणजे यंदा शिवसेनेच्या महिला खासदारांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भावना गवळींची लागणार मंत्रीपदी वर्णी ?

सलग पाचव्यांदा लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचा खासदार भावना गवळी यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाच वेळा निवडून येणाऱ्या विदर्भातील त्या एकमेव महिला खासदार आहेत. गेल्या वेळी ९२ हजार मतांच्या आघाडीने निवडून येणाऱ्या भावना गवळी या वेळी तब्बल १ लाख १७ हजार मतांची आघाडी घेतली.

शिवसेनेला कॅबिनेटसह उपसभापतिपद ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला दोन कॅबिनेट दोन राज्यमंत्री पदासह लोकसभेचे उपसभापती पद मिळण्याची चर्चा आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री तसेच लोकसभेचे उपाध्यक्ष किंवा राज्यसभेचे उपसभापती पद मिळणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. वायव्य मुंबई खासदार गजानन कीर्तिकर हे सलग चौथ्या हे सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत त्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे कीर्तिकर यांच्यासह संजय राऊत, प्रतापराव जाधव, भावना गवळी, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत यांचीही नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.