पोलिसांकडून आर्मीच्या जवानाला पोलिस ठाण्यात ‘बेदम’ मारहाण

बाराबंकी : वृत्तसंस्था – भारतीय सेना आणि भारतीय पोलीस दोन्ही एकाच शासनाचे दोन पैलु आहेत. मात्र दोघांच्या काम करण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे त्यांच्यात पटेलच असं नाही. उत्तर प्रदेशमध्ये सुट्टीवर आलेल्या एका सैन्य दलातील जवानाचे आणि युपी पोलीसाचे वाद झाले. जवानाने सांगितल्यानुसार युपी पोलीसाने त्याला रस्त्यात पकडले आणि रात्रभर पोलिस ठाण्यात बंद करून मारहाण करण्याची घटना घडली आहे. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरु झाला आहे. हा जवान भारतीय सेनादलात लान्स नायक पदावर जालंधरमध्ये कार्यकरत आहेत.

भारतीय सेनेतील लान्स नायक पदावर काम करणारे संदीप कुमार आपल्या दोन मित्रांसह बाईकवरून घरी चालले होते. तेव्हा बाराबंकी येथील एका पोलीस अधिकारी आणि त्यांचे तीन सहचारी रात्रीची चेकिंग करत होते. तेव्हा त्यांनी संदीप कुमार यांना ताब्यात घेत मारहान केली. एवढेच नाही तर त्यांनी त्यांना पोलीस स्टेशनला नेऊनही मारहाण केली. तसंच पोलिसांना आपण भारतीय सेना दलातील जवान असल्याचे सांगितल्यानंतरही त्यांनी तुम्हालाच आधी नीट करण्याची गरज आहे, असं म्हणत अजून मारहाण केल्याचे, संदीप कुमार यांनी सांगितले.

दरम्यान, पोलीसांच्या सांगण्यानुसार संदीप कुमार यांनी आधी पोलीसांशी दुर्व्यवहार केला म्हणून त्यांना अटक करण्यात आली. तसंच बाराबंकी येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी आर. एस. गौतम यांनी, पोलीसांना बाराबंकी चौकीच्या क्षेत्रात काही लोक गोंधळ करत असल्याची माहिती मिळाली होती. तेथे गेल्यावर पोलीसांनी त्यांना अडवले तर त्यांनी पोलीसांशी योग्य व्यवहार केला नाही. त्यामुळे पोलीसांनी त्यांना अटक करत योग्य कारवाई केल्याची माहिती दिली.

आरोग्यविषयक वृत्त