RTO ने जप्त केलेली कार सोडल्यानंतर PRD जवान आणि Home Guard मध्ये ‘तुंबळ’ हाणामारी (व्हिडिओ)

वृतसंस्था : जनतेची सुरक्षा करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर देण्यात आली आहे ते पोलीस आपली शक्ती आता एकमेकांना मारण्यात गमावत असतील तर जनतेच्या सुरक्षेचे काय होईल ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बागपत येथे घडली आहे. या घटनेमध्ये होमगार्ड आणि पीआरडी जवान (PRD) प्रांतिय रक्षा दल यांच्यात तुंबळ मारामारी करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सीओ आर.के.कुशवाह यांनी सांगितलेल्या माहितीनुसार हा प्रकार बडौत पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे. आरटीओ ने एक गाडी पकडली होती. ती गाडी नंतर सोडण्यात आली. तेव्हा कर्तव्यावर जो होमगार्ड होता त्याने ती गाडी सोडून दिली. तेथेच मंडी गेट जवळ पीआरडी जवान उभा होता. त्याने ती गाडी थांबवली तेव्हा होमगार्ड याने पीआरडी जवानास गाडी का अडवली म्हणून जाब विचारला. यावरून दोघांमध्ये सुरवातीला बाचाबाची झाली. नंतर त्याचे रुपांतर मारामारीत झाले. दरम्यान होमगार्ड व पीआरडी जवान यांच्यात झालेल्या मारामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like