पूर्ववैमनस्यातून पिंपरीत हाणामारी ; पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे आणि आरोपींचे पूर्वी भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरुन पाच जणाच्या टोळक्याने शुक्रवारी (दि.७) रात्री साडेबाराच्या सुमारास तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना पिंपरी येथील खराळवाडीमध्ये घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जफर अब्दुल अझाद (वय २०,रा. खराळवाडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. योगेश धोत्रे (वय २५,रा.खराळवाडी), सागर वीटकर (वय २२,काळेवाडी), आकाश जाधव (वय २३, रा.खराळवाडी), अतुल धोत्रे (वय २७,रा.खराळवाडी), राजू चौघुले (वय १९,रा.खराळवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.

फिर्य़ादी जफर आझाद हा खराळवाडीतील घराजवळ उभा होता. त्याला मोबाईलवर योगशने संपर्क साधला. कोठे आहेस? मला तुझ्याशी बोलायचे आहे असे सांगितले. त्यास घराजवळ आहे, असे फिर्यादीने सांगितले. काही वेळातच योगेश काही साथीदारांना घेऊन तेथे आला. काहीही न बोलता त्याने फिर्यादीवर हल्ला चढविला. लाथा बुक्यांनी मारहाण करू लागला. त्यावेळी योगेश धोत्रे याने हातातील कोयता उलटा करून फिर्यादीच्या डोक्यात मारले. त्याचवेळी सागर विटकर याने हातातील वस्तुने फिर्यादीच्या डोळ्यावर मारल्यामुळे त्यांच्या डोळयाला गंभीर इजा झाली. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अद्याप आरोपींना अटक केलेली नाही. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us