टोल मागितला म्हणून त्यानं उचलला महिला कर्मचाऱ्यावर हात, हाणामारी (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरियाणातील गुरुग्राम द्रुतगती मार्गावरील खेरकिदौला टोल प्लाझावर गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. जेव्हा कारमधून जाणाऱ्या युवकाला टोल मागितला तेव्हा तो रागावला आणि त्याने एका महिला कर्मचाऱ्यावर हल्ला केला. मात्र, संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. सध्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

कारमधून जाणाऱ्या युवकाला टोल मागताच तो अचानक रागात आला आणि त्याने महिला टोल कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतर महिला कर्मचाऱ्याने देखील त्यावर हात उचलला आणि सुरु झाला हाणामारीचा गोंधळ. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. इतर कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला तातडीने पोलिसांच्या ताब्यात दिले.

आरोग्यविषयक वृत्त –