‘या’ टॉप 6 अभिनेत्यांचे फिल्मी करिअर धोक्यात !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये असे काही अभिनेते आहेत जे मोठ्या पडद्यावरून अनेक दिवस गायब दिसतात तर मध्येच ते पडद्यावर झळकतात. अेसही काही अभिनेते आहेत ज्यांचं फिल्मी करिअर सध्या धोक्यात आहे. अशाच काही अभिनेत्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

6) विक्रम-
तमिळ अ‍ॅक्टर विक्रमचं फिल्मी करिअर गेल्या वर्षभरापासून काही खास नसल्याचं दिसत आहे. त्याचे अलीकडेच आलेले काही सिनेमे कदाराम कोंडन, सामी स्क्वायर आणि स्केच बॉक्स ऑफिसवर आपलं बजेटही कव्हर करू शकलेले नाहीत.

View this post on Instagram

300 📸 Dhruv V

A post shared by Vikram (@the_real_chiyaan) on

5) सैफ अली खान
सैफ अली खानचा लाल कप्तान सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमातून आशा होती की, तो बॉलिवूडमध्ये कमबॅक करेल. परंतु असे काही झाले नाही. सैफचा लाल कप्तान हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालला नाही.

4) सूर्या-
तमिळ सिनेमातील सिंघम अभिनेता सूर्याचं फिल्मी करिअरही धोक्यात असल्याचं दिसत आहे. यावर्षी सूर्याचे दोन मोठे सिनेमे एनजीके आणि काप्पन बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले आहेत. याआधी त्याचा कोणताच मोठा सिनेमा फ्लॉप झाला नव्हता.

3) इम्रान हाश्मी-
अभिनेता इम्रान हाश्मीचं करिअरही गेल्या अनेक दिवसांपासून थंड पडलं आहे. त्याचे मागील अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपटले आहेत. यावर्षीही त्याचा कोणता सिनेमा हिट ठरताना दिसला नाही. पुढील वर्षी तो चेहरे आणि मुंबई सागा अशा दोन मोठ्या सिनेमात दिसणार आहे.

2) अर्जुन कपूर-
या यादीत अर्जुन कपूरचंही नाव समाविष्ट आहे. कारण त्याचेही काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपटले आहेत. अर्जुन त्याचा आगामी सिनेमा पानीपतमध्ये दिसणार आहे. यासाठी तो खूप मेहनत घेत आहे.

View this post on Instagram

स्मार्ट BOY

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

1) सिद्धार्थ मल्होत्रा-
बॉलिवूडमध्ये सुपरहिट सुरुवात करणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्राचंही करिअर धोक्यात आहे. त्याचे मागील सिनेमे जबरिया जोडी, अय्यारी, ए जेंटलमन, बार बार देखो बॉक्स ऑफिसवर आपलं बजेटही काढू शकले नाहीत. लवकरच तो मरजावां या सिनेमात दिसणार आहे. पुढील महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार आहे.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like